Close
In Travel

क्लास_बामणोली

काखेत कळसा गावाला वळसा म्हणत्यात अगदी तसा
मुलुक आपल्या साताऱ्याचा हाय बघा अगदी तसा

कशाला गोवा, कशाला उट्टी, कशाला केरळ पाहिजे
कक्षेत आपल्या सारं काही फक्त शोधायची खुजली पाहिजे!

वार शनिवार, तारीख फेब्रुवारीची नऊ, वेळ चार साडे चारची!
बऱ्याच दिवसांपासून पुढच्या रविवारी जाऊ, पुढच्या रविवारी जाऊ म्हणत पोस्टपॉन होत चाललेली, यादिवशी मुहूर्त लागलेली कल्पना बामणोली नाईट आउटची!

आमच्या मेडिकल असोशिएशन क्रिकेट टीमचे धडाकेबाज फलंदाज अन तिखट तेजतर्रार गोलंदाज, खुद्द बामणोलीचे रहिवासी श्रीयुत बाळू पवार यांची बोट स्वतःची! 
बाळूदांचे चोख अन बाय बॉटम ऑफ हर्ट नियोजन अन साथ त्यांच्या तीन चार मावळ्यांची !

आठ सातशे मधून आशिष लाहोटी, जयेश शिंदे, राहुल जगदाळे, विकी जैन, बंटीशेठ भट्टड आणि मी, कूच बामणोली कडे अशा सहा जणांची! 
बामणोलीत एंट्री मारताच बाळूदांचे दर्शन फॉलोड बाय चव त्या कडक स्पेशल चहाची!

वेळ सूर्यास्ताची, पाण्यावर पडणारी सोनेरी चकचकीत किरणे मावळत्या सूर्याची!
नेटाने उभे राहिलेले इवले इवले तंबू नदीकाठचे, एका लाईन मध्ये शिस्तीत किनाऱ्याला पकडून उभे राहिलेले ताफे बोटींचे!

वाढत्या थंडीत पक्षांच्या किलबिलाटात चकचक चकाकणारे ते भगवे सायंकाळी रूप बामणोलीचे! 
गडद होत चाललेल्या अंधारात नदीच्या पलीकडे जायला पाण्यातून केलेला तो प्रवास बोटीचा! 
नदीपलीकडे गेल्यानंतर काळ्याकुट्ट अंधारात चहू बाजूंनी पाण्याने वेढलेले ते लोकेशन पाहून बाहेर पडलेला एकमुखी वॊव तो सर्वांचा!

सेटअप तंबुंचे, मांडणी चुलीची अन शहारे आणणारी फिलिंग पाण्याने वेढलेल्या त्या निर्मनुष्य बेटावर बोचऱ्या थंडीत पुढे जगायच्या काळ्याकुट्ट अंधाऱ्या रात्रीची! 
चरचरीत, रसरशीत जेवणाने तुडुंब भरलेली पोटे साऱ्यांची, चवीने झालेली तृप्ती जिभांची,
अंग गरम करायला शेक देणारी धग शेकोटीची, शेक घेताना सोबत रंगलेली मेहफिल गाणी अन क्रिकेटच्या गप्पांची,
सुसाट सुटलेल्या हवेत खाली उबदार मॅट अन वरती तंबूचे छप्पर, यांत लागलेली सुखद गाढ झोप साऱ्यांची!

नदीकाठच्या निरव शांततेत सुर्योदयाबरोबर झालेली प्रभात,
निळ्यागर्द नभाच्या छताखाली शांत, शीतल पाण्याच्या किनाऱ्यावर चाललेला तो पक्षांचा किलबिलाट,
त्या निर्मळ वातावरणात त्याच शीतल पाण्यामध्ये स्नान करत सारा क्षीण विसरायला लावणारं अर्घ्य पूर्वेच्या देवाला दिलेलं,
शरीर अन मन अंतर्बाह्य निर्मळ करणाऱ्या भावनेनं अंतःकरण ते भरून आलेलं,
त्याच भरलेल्या अंतःकरणाने पुढे त्रिवेणी संगमावर आलेली निरव, निर्मळ, निर्भेळ शांतीची विलक्षण अनुभूती,
त्या अनुभूतीने परतीच्या प्रवासात प्रत्येकाला आठवून गेल्या जिंदगी ना मिलेगी दोबाराच्या फरहान अख्तरच्या त्या चार पंक्ती :

"दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम नज़र में ख्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम हवा के झोकों के जैसे आज़ाद रहना सीखो 
तुम एक दरियाँ के जैसे लहरों में बहना सीखो 
हर एक लम्हें से तुम मिलो खोले अपनी बाहें 
हर एक पल एक नया समा देखे यह निगाहें 
जो अपनी आँखों में हैरानियाँ लेके चल रहे हो, 
तो ज़िंदा हो तुम दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम!!"

- D For Darshan

 

Loading...
Loading...