Close

Mitali Nyati- The Birthday Girl

गोरी गोरी पान फुलासारखी छान
मिताली मला तू जीव की प्राण! 

गाळणची मिताली पाचोऱ्यालाही शिकली
कॉलेज करावया जळगावला गेली
तीन तीन घरी राहून घेतले तिने अनुभव फार
मिताली मला तू जीव की प्राण! 

तिच्या भट्टडांच्या आत्याने मनावर घेतले
या खानदेशच्या सोन्याला राजधानीत आणले
योगे त्या मिळाली मला ही बायको छान
मिताली मला तू जीव की प्राण! 

पाचोऱ्याची मुलगी ही साताऱ्याला आली
न्यातींची कन्या ही सून लाहोटींची झाली
तिच्या येण्याने वाढली आमच्या घराची शान
मिताली मला तू जीव की प्राण! 

अन्वीच्या रूपाने प्रेमाचा अंकुर फुलला
मोहर संसाराचा बहरून गेला
चोख आहे हिला आईच्या नात्याची जाण
मिताली मला तू जीव की प्राण! 

एका तारेत अस्खलित हिंदी ही बोलते
'ते तर आहेच' म्हणत बोलबच्चन ही करते
जिथे जाईल तिथे होती हिच्या ओळखी फार
मिताली मला तू जीव की प्राण! 

 जुन्या नव्या गाण्यांवर ताल ही धरते
पकडून बीट बघा ठुमकेही लावते
आहे रक्तातच जणू हिच्या नाच अन गान
मिताली मला तू जीव की प्राण! 

चवदार हातांची ही सुगरण
विचारांतही हिच्या कमालीचे वजन
शिक्षण मूल्यांचे हिने घेतलेय छान
मिताली मला तु जीव की प्राण! 

 गोरी गोरी पान फुलासारखी छान
मिताली मला तू जीव की प्राण! 

जनमदिन की ढेर सारी शुभकामनाये वायफी!! 


- D For Darshan