Close

Share Your Good Dids

'उजव्या हाताने दिलेलं डाव्या हातालाही ना कळावं असं दान करावं' अशा आशयाची म्हण दानाविषयी प्रचलित आहे,

बहुदा दान केलेल्याचा यत्किंचितही गर्व त्या दात्याला नसावा अशा आशय तिच्या पाठी आहे!

एकार्थी ही म्हण चांगली आहे पण आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात ती काहीशी 'आऊटडेटेड' वाटतेय,
कारण आज आपला स्टेट्स अपडेट दुनियेला देणं आणि दुनियेच्या स्टेट्स ना फॉलो करणं या ट्रेंडला दुनिया फॉलो करतेय!

मग अशा अपडेट मध्ये आपल्या हातून होऊन गेलेलं असं एखादं चांगलं काम टाकायला, जेणेकरून ते आपल्या स्नेहीजनां पर्यंत पोहचेल असं कृत्य करायला काय हरकत आहे?
हे नक्कीच 'दान हे गुप्त असावं' या संकल्पनेला contradict होईल पण पुन्हा दान हे गुप्त का असावं हा ही प्रश्नच आहे!

आजकालच्या काळात असं होऊन बसलंय की दानासारखी चांगली कामे ही लपूनछपून केल्यामुळे दडून राहताहेत,
वाईट कामे मात्र दुनियेच्या नजरेत अक्षरशः भरून वाहताहेत!

वर्तमानपत्र उघडलं की हमखास आठ दहा खून, दोन चार बलात्कार, चार दोन घोटाळे वा दरोडे यांनी फ्रँटपेज भरून गेलेलं असतं,
एखाद्या चॅरिटी वा गौरवाच्या बातमीचं मात्र आत कुठेतरी पाचव्या पानाच्या ईशान्य कोपऱ्यात छोटस घरटं बांधलेलं दिसतं!

कधी कधी मला असं वाटून जातं की बऱ्याचवेळा नकारात्मक वातावरण निर्माण व्हायला ही चांगली कामे करणारी चांगली लोकही जबाबदार असतात,
कारण ही लोक आपण करत असलेली चांगली कामे पुण्य कमावण्याच्या स्वार्थापायी लपून छपून करतात!

सोशल मीडियाच्या या जमान्यात गुप्तदानाची रीत बदलून सढळ हाताने करत असलेल्या दानधर्माचे सढळ हाताने सोशल शेअरिंग का होऊ नये,
आपण केलेल्या चांगल्या सकारात्मक कामांचं आत्यंतिक शेअरिंग करण्याची आपसांत जणू स्पर्धाच का लागू नये!

एक दोघांमुळे चार प्रेरित होतील चारांमुळे होतील आठ,
जणू स्पर्धा लागेल आपसांत होण्या चांगल्या कामांची खैरात,
पाहता पाहता सर्वच जण झोकून देतील स्वतःला शुभकार्यात,
सोशल प्लॅटफॉर्म्स वरती असेल ती नव्या पर्वाची सुरुवात!

- D for Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...