Close

Umesh Mahajan - The Birthday Boy

जमिनीपासून सहा फूट उंचीच्या गोऱ्यापान भक्कम फौजदारी शरीरयष्टीचे मालक, 

अखंड तारळे पंचक्रोशीच्या किराणा व्यवसायावर नियंत्रण असलेले महाजन घराण्याचे अनुभवी उद्योजक, 

डाव्या दाढेत काडी, उजव्या हातात पेन, समोर कागद-कॅल्सी ठेऊन सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत उभ्या जागेवरून बेरजा मारत अखंड शनिवार पेठ आपल्या नजरकक्षेत ठेवणारे व्यवहारी व्यापारी, 

चरेगाव च्या उंब्रज स्थित सुप्रसिद्ध बागायतदार शेटे घराण्याचे थोरले जावई, 

आपल्या मेव्हन्यांना आपल्या अप्रत्यक्ष दहशतीत ठेवणारे, पण तसे कधीही दाखवून न देणारे संसारात मुरलेले पाहुणे, 

समर्थ कृपेने स्वतःला, कुटूंबाला त्याचबरोबर आपल्या आप्तेष्ट भक्तजनांना बैठकीच्या माध्यमातून संतसंग घडवून आणणारे व्यासंगी, 

संतसंगाबरोबरच भल्या पहाटे उठून त्याच आप्तेष्टांना योगसंगही घडवून आणणारे तारळे गावचे योगगुरू, 

कोणत्याही परीस्थितीमधे सिरीयल्सचे टायमिंग न चुकता त्यांना रेग्युलर्ली फॉलो करणारे छोट्या वाहिनीचे मोठे रसिक, 

गाडीमध्ये बसल्या बसल्या आहेत ती गाणी बंद करून स्वतःच्या मोबाईल मधलेच गाणे ऐकविण्याचा हट्ट धरणारे हट्टी कलारसिक, 

चार पैसे कमी द्यायला लागले तरी चालतील, दोन चार (शे) किलोमीटर जास्त रन झाला तरी चालेल, पण खाण्यापिण्यात अजिबात तडजोड न करणारे शाकाहारी खादाड कार्यकर्ते, 

त्यातूनही कुठे तडजोड झालीच तर एका कानफटात आडवा पाडण्यासारखी प्रेमळ दमदाटी करणारे सक्तीचे नेते, 

माझाही फोटो काढा आवड संघटनेची तहहयात मेम्बरशीप असणारे स्वचित्रप्रेमी, 

आमचे वरिष्ठ जन्मदिन बंधू श्री श्री सोमनाथशेठ महाजन उर्फ उमेशशेठ यांना समस्त सवंगडी परिवारातर्फे प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!!


 
- D For Darshan
 
 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...