Close

Gopal Bartakke - The Birthday Boy

गोपाला गोपाला आज बद्डे तेरा गोपाला
पार्टी कहा देगा बोल प्यारे गोपाला

तारले में गोपाला, सातार मे गोपाला
उंब्रज में गोपाला या कराड में गोपाला

गोपाला गोपाला आज बद्डे तेरा गोपाला

जुन्या जमान्यातील स्टेज ब्रेकर गोपाला
स्लो मोशन डान्स चा ट्रेंड सेटर गोपाला
टोपीत वावरणारा मायकेल जॅक्सन गोपाला
ब्रेक डान्स करणार वुइथ व्हेरिअस ऍक्शन गोपाला

गोपाला गोपाला आज बद्डे तेरा गोपाला

जरासं मागं सरकून कॅरम खेळणारा गोपाला
राऊंड शॉट चांगला मारतो असा ग्रह असणारा गोपाला
लहान वयात बॉल उंच मारून तडक धावणारा गोपाला
आजही पाय कितीही भरून आले तरी बॉलिंग मात्र हौसेने करणारा गोपाला

गोपाला गोपाला आज बद्डे तेरा गोपाला

यौवनात रेडीयमचा झाकपुक करणारा शूज घालणारा गोपाला
मॅच करायला कडक व्हाईट जॅकेटची झूल चढवणारा गोपाला
तरुणाईत बिलंदर चावट विनोद करणारा गोपाला,
एकसुरी जीवनामुळे आज थोडंस विस्मरण झालेला गोपाला

गोपाला गोपाला आज बद्डे तेरा गोपाला

कुटूंबावर आंतरिक प्रेम करणारा गोपाला,
सर्वांनी मिळून मिसळून रहावे असा भाव ठेवणारा गोपाला,
प्रेम नावाप्रमाणेच प्रेम बरसणारा गोपाला,
क्रेटाच्या डाव्या सीटचा पर्मनंट सीटर असणारा गोपाला!

गोपाला गोपाला आज बद्डे तेरा गोपाला
पार्टी कहा देगा बोल प्यारे गोपाला!

श्रीयुत गोपाळ बारटक्के उर्फ प्रेम यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!!


 
- D For Darshan
 
 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...