Close

Sushil Phalke - The Birthday Boy

अत्यंत चाणाक्ष आयडियल हा आयडियल ओशियनचा,
होता हुशार इंजिनिअर विद्यार्थी साताऱ्याच्या गवळी कॉलेजचा!

क्रिकेटर होण्याचं स्वतःच स्वप्न जरी धुळीस मिळालं,
तरी इंजिनियर होऊन बाबांचं स्वप्न मात्र पूर्ण केलं!

संगणक क्षेत्रातील प्रत्येक समस्येचं निराकरण हा वकूब याचा,
उगाच नाही मिळवला मान याने कॉलेजमध्ये रांचो नावाचा!

बोलण्यात वेळ न दवडता हा सरळ करुन दाखवतो,
आपल्या सिंसीयर ऍप्रोच ने समोरच्याला आपल्या प्रेमात पाडतो!

पहिल्या भेटीत याची बौद्धिक उंची समजणे कठीण जाते,
जस जसा वेळ जाईल तस तशी ती उंची तुम्हाला भुरळ पाडते!

याची शारीरिक ताकद पहायचिये तर जिम मध्ये या,
आरामात दोन एकशे डिप्स मारणारा अवलिया आहे हा!

सरसर झाडावर चढतो अन एकशे वीस च्या स्पीडने बुंगाट धावतो,
एखाद्या मोटर्ड मशीन प्रमाणे सपासप पूलअप हा मारतो!

दणकून खातो, अधेमधे जागेपणी एखाद दुसरा डुलकाही मारतो,
उठायला आळशीपणा करतो कारण मूव्हीज पाहण्यात रात्र जागवतो!

हॉलिवूड प्रेमी ज्याने युट्यूब वर पाहायची राहिलेली एक मूव्ही काही ठेवली नसेल,
गेमप्रेमी हा ज्याचे प्रत्येक हीट गेम मधे काही ना काही रेकॉर्ड असेल!

यापलीकडे जाऊन तुफान डान्स ही करतो,
दिल मे बजी घंटी वर नाचत पाहणाऱ्याच्या दिलाची घंटी वाजवतो!

जबरदस्त नशीबवान समजतो मी स्वतःला जो हा सुशील माझ्या जिंदगीत आला,
एका चांगल्या मित्र कम सहकाऱ्याचा माझा रकाना भरून गेला!

प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा इंजिनियर सुशील उर्फ पप्या उर्फ रांचो!! तुझ्यातल्या प्रत्येक स्किल्ड रांचोची उत्तररोत्तर प्रगती होत जाओ, तुझं उभं आयुष्य अफाट आनंदाने अक्षरशः भरून वाहो!! हैपी बद्डे!!

With Love

iDeals @ iDealOcean

- D For Darshan
 
 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...