Close

Sunil Bhandari - The Birthday Boy

येणाऱ्या प्रत्येक दिवशी, आप्तेष्टांचा येणारा प्रत्येक वाढदिवस, अत्यंत उत्स्फूर्तपणे साजरा करणारे गोटूशेठ आज वाढदिवस

खुद्द तुमचा,

तुमच्या वाढदिनी तुमच्या शुभचिंतनाचे चार शब्द लिहायला मिळणे हा समजतो मान आम्ही आमचा!

शेठ, आपल्या विषयी काही लिहिण्याआधी मी स्वतःविषयी अनुभवलेल्या तुमच्या आपुलकीच्या चार गोष्टी लिहीन,
प्रेम, आपुलकी, जिव्हाळा यांचा सुरेख संगम असलेला मी अनुभवलेला गोटूशेठ दुनियेला सांगीन!

साताऱ्यात रहायला आल्यानंतर मला पामराला आपुलकीने कॉल करून शुभेच्छा देणारी पहिली व्यक्ती शेठ तुम्ही होता,
घरी जेवायची दावत देऊन आमरसाचे मिष्टान्न जेवण खाऊ घालणारी व्यक्ती शेठ तुम्ही होता,
मला बच्चन म्हणून लाडाने साद घालणारी व्यक्ती शेठ तुम्ही होता,
कोणत्याही गोष्टीसाठी कौतुकाने पाठीवर शाबासकीची थाप टाकणारी व्यक्ती शेठ तुम्ही होता!

आत्ताही फेसबुक वर सोडलेली कोणतीही पोस्ट लाईक करण्याचा पहिल्या पाच मधला मान तुमचा असतो,
तुमच्या स्टिकर कंमेन्ट वरती मी कधी लाजून जातो तर कधी मनमुराद हसतो!
हा माझाच काय तर तुमच्या नेटवर्क मधल्या कित्येक एफबी युजर्स चा तुमच्या विषयीचा अनुभव असेल,
कारण तुमच्यातल्या या दिलदार हृदयाच्या व्यक्तीच्या जिव्हाळ्याचा पाईक होण्यास जो तो पात्र ठरला असेल!

गोटूशेठ, इतरांप्रमाणेच तुमचं स्वतःवर असलेलं अपार प्रेमही आम्हाला ज्ञात आहे,
जाईल त्या ठिकाणी मेन व्यक्तीसोबत वट लावून काढलेला तुमचा फोटो तुमच्या वॉल वर झळकत आहे!

तुम्हाला ओळख वगैरे असावी लागत नाही शेठ तुम्ही जाईल तिथे ती अशी लीलया काढता,
गोव्यासारख्या ठिकाणीही आपल्या सहजनांना डिस्काउंट मिळावा म्हणून स्वतःला न लाजता त्यांचा ड्रायव्हर म्हणून सांगता!

जेवणाच्या टेबल वरती ही शेठ तुम्ही फुल्ल धमाल करता,
शेजाऱ्याचा वाढदिवस आहे सांगून वेटर ला आसपास चोख सेवा द्यायला बिझी ठेवता!

शेठ, तुमचा आप्तजनांवर एवढा प्रभाव आहे की गोटुशेठ नसले तरी त्यांची चर्चा मात्र हमखास असते,
आपल्या निखळ विनोदी स्वभावाने इतरांना हसवणाऱ्या गोटूशेठ विषयींची नुसती ती चर्चाही हास्यकल्लोळ घडवून आणते!

तुमच्या विनोद वा वाक्याची दखल जर चुकून समोरच्याने घेतली नाही तर 'इकडं बघ' म्हणून भाग पाडण्याचे कौशल्य शेठ तुमचे,
गाडी चालवणाराही मागे पाहिल्याविना रहात नाही पहायचे विसरून समोरचे!

गोटुशेठ तसा पैसा हातातून सोडताना तुमच्यातला मारवाडी जागा होतो,
पण कोणाला अडीनडीला मदत करायची वेळ आली तर मात्र तोच हात सर्वात पुढंही येतो!

'गोटूच्या मनात काही नसतं' अशा कोटीने शेठ तुम्ही फेमस आहात,
प्रेम, जिव्हाळा अन आपुलकीचा शांत निर्मळ वाहणारा झरा आहात!

पवारसाहेबांना कायम आपल्या श्रद्धास्थानी ठेवणारे गोटूशेठ तुमचे राष्ट्रवादी प्रेम माहित नसलेला आता कोण असणार?
खरंतर मी शुभेच्छामध्ये राजकारण आणत नाही पण खात्री आहे मला तुमच्या या शुभेच्छा दस्तुरखुद्द बाबामहाराजही वाचणार!

त्यांनी वाचल्या नाहीत तरी तुम्ही त्यांना वाचायला भाग पाडणार,
तुमच्या गडबडीतल्या त्या लगबगीने तुम्ही त्यांनाही एकशे एक टक्के हसवणार!

शेठ, जरासं इकडं तिकडं झालं नाहीतर तुम्ही विद्यमान मेहेरबान असता,
पण झाला तो इतिहास आता वर्तमानातही मस्त सेट आहे तुमचा भावी मेहेरबान होण्याचा रस्ता!

मंडईच्या चौकात रोज खुर्चीवर विराजित होणारे गोटुशेठ तुम्हाला नगराची सेवा करणाऱ्या खुर्चीवर बसलेलं पहायचय,
माझ्यासारख्या तुमच्या अखंड अशा प्रचंड फ्यान फॉलोविंगसाठी तुम्हाला तुमचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचंय!

फ्रेंडलिस्ट मध्ये पाच हजारापेक्षा जास्त कनेक्शन्स असणाऱ्या समाजातील तुरळक लोकांपैकी शेठ तुम्ही एक आहे,
गोटूशेठ म्हणजे साधी सुधी कोणी आसामी नसून तो आज एक चालता बोलता ब्रँड आहे!

श्री सुनीलशेठ भंडारी उर्फ गोटूशेठ दि ब्रँड तुम्हाला तुमच्या प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा,
तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर आनंद अन प्रेमाची अशीच उधळण होत राहो हीच तुमच्या वाढदिनी सदिच्छा!!

 

- D For Darshan

 
 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...