Close

Manoj Awale - The Birthday Boy

प्रसिद्ध आवले घराण्याच्या त्रिमूर्तीपैकी धाकली मूर्ती,
औषध विक्रीच्या माध्यमातून जी प्राप्त करतेय कीर्ती!

मनोज मेडिकल्स नावाने आहे दुकान ज्याचं,
म'नोज' नावाप्रमाणे जे जणू 'नोज' शनिवार पेठेचं!

औषधालयालाजोड विधविविध मोबाईल सेवांची,
तत्सम समस्यांचं कुशलतेने निराकरण करणे ही कला ज्याची!

असला जरी फार्मासिस्ट तरी जणू तो एक इंजिनियरच आहे,
ज्याच्या स्वशिक्षित तंत्रविद्येला अखंड ग्राम परिचित आहे!

या औषधोपचार अन तंत्रोपचाराने ज्याने आपली नाळ हरएक तारळेवासियाशी जोडली आहे,
सल्ला घेण्या जयापाशी आपलं मन मोकळं करणं हे कित्येकांचं नित्यकर्म आहे!

सामाजिक राजकारणातील सक्रियता हा ज्याचा छंद आहे,
यामुळेच स्पष्ट, परखड अन वेळप्रसंगी किंचितसा वकिली अडगापणा याच्या स्वभावाचं एक अंग आहे! ;)

तुझ्या वाढदिनी वेळेअभावी वेळेवर शुभेच्छा देऊ शकलो नाही याची मला खंत आहे,
मनोज, आपल्या मैत्रीवर या दर्शनचं प्रेम मात्र अनंत आहे!

जवळपास दोन दशके तुझ्या मित्रछायेत वाढताना जमा झालेला आठवणींचा खजिना मला यायोगे आठवतोय,
शब्दांच्या या चौकटीत त्या आठवनिंना शब्दबांधील करण्याचा इवलासा प्रयत्न मी करतोय!

आपलं घरासमोरील रस्त्यावरचं दिवस रात्र खेळलेलं गल्ली क्रिकेट असो,
वा तब्बल पाच ते सहा वर्षे नित्यनेमाने उठून ग्राऊंडवरचं मॉर्निंग क्रिकेट असो!
त्या नाईट क्रिकेट मध्ये असामान्य महत्व असलेली 'मनोजची लाईट' असो,
वा मॉर्निंग क्रिकेट चा अतुल्य भाग राहिलेली तुझी कडक शिस्तीची फायन्यानशील म्यानेजमेंट असो!
वर्षानुवर्षे आपण दारात खेळलेल्या बॅडमिंटनचा नाट असो,
वा रात्री उबाळेंच्या शॉपवर जाऊन घातलेला कॅरमचा घाट असो!

अशा कित्येक तरल आठवनींना तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाझर फुटतोय,
मागे जाऊन त्या सर्व पुन्हा वारंवार जगायला या मनाचा झरा द्रवतोय,
मागे जाऊन त्या सर्व पुन्हा वारंवार जगायला या मनाचा झरा द्रवतोय!!

प्रकटदिनाच्या थोड्या लेट पण थेट शुभेच्छा मनोजशेठ!!!  

ता.क. तुमच्या जेवणाने आम्ही तृप्त झालोच आहोत पण हातासरशी या निमित्ताने अन मान्सून आहे तोपर्यंत सवंगड्यांचा अर्थमंत्री या नात्याने तेवढ्या उर्वरित फंडाच्या विनियोगाचं मनावर घ्या! 

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...