Close

Nilesh Modak - The Birthday Boy

संपूर्ण सातारा शहर व इतरेतर परिसरातील रुग्णांना, मग ती माणसे असो वा जनावरे, औषधविक्रीच्या माध्यमातून वर्षानुवर्षे

सेवा पुरविणाऱ्या मोती चौकातील सुप्रसिद्ध मोडक केमिस्टचे मालक श्री निलेश मोडक,

आपल्या तरुणाईमध्ये शरीर सौष्ठत्वाच्या वेडाने पछाडून गुंतवणूक केलेल्या त्या वेळाला योग्य न्याय देत विविध ठिकाणी विविध स्तरांवर झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धांचे राहिलेले विजेते श्री निलेश मोडक,

उंची लहान असली तरी शरीराची रुंदी मोजायला मिटर कमी पडेल अशी एकेकाळी साईझ असलेल्या बलदंड अन बलवान शरीराचे मालक बिल्डर श्री निलेश मोडक,

ऐन तारुण्यात वडिलांची छत्र छाया गमावल्यामुळे दुकान आणि परिवाराचा पडलेला भार आपल्या भक्कम खांद्यावर व्यवस्थित सांभाळून घेतलेले श्री निलेश मोडक,

कोणत्याही गोष्टीत एकदा का हात घातला की त्यामध्ये हातोटी येईपर्यंत तिचा पिच्छा न सोडायचा जात्याच चिवट स्वभाव असलेले श्री निलेश मोडक,

आपल्या मित्रांवर जीवापाड प्रेम करणारे अन म्हणूनच प्रत्येकाला असा एकतरी मित्र असावा च्या कोटीत परफेक्त बसणारे दिलदार मित्र श्री निलेश मोडक,

क्रिकेट असो, फुटबॉल असो, टेनिस असो वा पुरी ऑलम्पिक असो, हरएक खेळावर दिलखुलास प्रेम करून त्यांना फॉलो करणारे राफाचे भक्त श्री निलेश मोडक,

डावखुऱ्या हाताने फलंदाजी अन उजव्या हाताने लांब रणप वाली तेजतर्रार गोलंदाजी करणारे ऑलराऊंड क्रिकेटर श्री निलेश मोडक,

दर काही दिवसांनी मार्केट मध्ये येईल त्या मोबाईल चे नवीन मॉडेल इएमआय वर घेऊन टेस्ट करण्याचा शौक करणारे मोबाईलप्रेमी श्री निलेश मोडक,

आजच्या घडीला कुत्र्यांच्या अखंड प्रेमात बुडालेले, यांची वॉल नुस्ती सर्फ केली तर कुत्र्यांच्या जंगलात गेल्याचा फील यावा अशी परिस्थिती असलेले प्राणीप्रेमी श्री निलेश मोडक,

एकदा बोलायला सुरुवात केली की न थकता नॉन स्टॉप आपले कॅसेट सुरु ठेवणारे बोलगप्पे श्री निलेश मोडक,

इम्रान हाश्मी ला आपला आदर्श मानत चित्रपट श्रुष्टीवर अपार प्रेम करणारे सिनेलव्हर श्री निलेश मोडक,

आपुल्या नवीन घरी बहुतेक याच वाढवर्षात राहायला गेलेले श्री निलेश मोडक,

निलेशशेठ, तुमच्यातल्या या मोडकांच्या प्रत्येक वेगवेगळया निलेश ला आमच्या कडून प्रकट दिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!! या प्रत्येक निलेश कडून वेगवेगळी पार्टी मिळावी बस हीच एक अपेक्षा!!  हॅप्पी बर्थडे ब्रो!

 

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...