Close

Nitin Agate - The Birthday Boy

आगाटेंचा मान, लाहोटी सर्जीकल्सचा प्राण,
अक्षा-निखिल-सुरज-रोहन ची जान,

उत्सवमूर्ती नितीन दी बॉस,
भावा तु लही महान!

शिवाजीच्या आर्टस् चा तू पदवीधर,
आपल्या चिकनेपणाने केलास कॉलेजात कहर,
आठ दहा प्रकारणे तर तू आरामात केली,
वहिनींनी हे वाचले तर मात्र तुझी फाटली!

घाबरू नको काही बोलल्याच तर मी येईन,
सारवासारवीला सोबत सर आणि पिसाळानाही आणीन,
मग मिटवून घेऊ आपण गोडी गुलाबीने,
त्यायोगे तुझी पार्टीही करू फुलऑन मस्तीने!

भावा, माझ्यायेवढीच तुझी उंची पाच अकराची,
शरीरयष्टीही तीच आपली उण्यादुण्या फरकाची,
दोघेही आपण करतो लहरीनुसार जीम,
कितीही साईझगेन चा प्रयत्न केला तरी राहणार स्लिम ट्रीम!

वाटतो तू जणू रंगीलाचा शाहरुख खान,
अदांपुढे तुझ्या फिका पडेल बाझीगर चा आमीर खान,
गाणं तुझं असं जसं की मुंबई ऍन्थम सचिनचं,
डान्स तुझा असा जसं की नाचणं मनोज कुमारचं!

आज दोन मुलींचा बाप असला तरी तुला मुलगी पटू शकते,
तुझे कॉलसेंटर वाल्यांशी संवाद पाहून मला अंधुक शंकाच येते,
तरी मी म्हणेन की मित्रा आता तो आपला प्रांत नाही,
वय झालं आपलं असं सैरभैर वागणं आपल्याला शोभत नाही!

गेले ते दिवस जेव्हा तू संत्याबरोबर एलिक्झिर डोक्यावर घ्यायचा,
तिथल्या फॅसिलिटेटर म्याम्स ना दोघे विनाकारण छळायचा,
इंग्लिश शिकण्याचा तुमचा तो प्रयत्न होता चांगला,
उगीच सोडला क्लास नाहीतर आज नसतास बोलायला ऐकला!

आठवतंय मला तुझं ते बेंबीच्या देठापासून गाणं,
रेकॉर्ड ही केलं होतं आपण तुझं ओम शांती ओम वालं दुखणं,
और इस दिल में वाले गाणे जीवाची राख करत गाणारा तू,
क्या हुआ तेरा वादा म्हणून त्या तमाम प्रकरणांना जाब विचारणारा तू!

साताऱ्यातला एक नंबरचा बॉलर असल्याचा भास तुला होत असतो,
पण दहा पावलांचे रणप घेऊन चौथ्या बॉललाच दमून जातो,
एकदा वाईड टाकायला सुरुवात केली की तू दमत नाहीस,
मात्र लय घावली की स्टार वाल्यांना पण तुझा बॉल कळत नाही!

मान्य आहे इथे तुझे जास्तच कपडे काढले आहेत मी जरा,
तुझ्या विनोदी स्वभावाला न्याय द्यायचा माझा प्रयत्न आहे खरा,
मित्रा तुझ्यासारख्या स्वभावाच्या माणसाला जिवाभावाने माणूस काहीही म्हणू शकतो,
कारण तुझ्यातला तो निर्मळ मनाचा माणूस कोणाच्याही जीवाला जीव लाऊ शकतो!

अक्षाचे कपाळ आणि निखल्याचे दात जरी कायम मध्ये मध्ये आणणारा तू,
तरी नित्या त्यांच्या मित्रदिलांवर अपार प्रेमाने राज्य करणाराही तूच,
तुझ्या या वाढदिवसाचा जोरदार जल्लोष झाला पाहिजे,
सुरज रोहन, भावांनो मोठ्ठाले टॅग द्या आपला भाऊ कानाकोपऱ्यात पोहचला पाहिजे,
अखंड पंचक्रोशीत एकच ठिणगी उठली पाहिजे,
नित्याच्या बद्डे च्या आगीच्या धुराने डबल आग लागली पाहिजे!!!

Happy new year Nitin bhau!!

 

- D For Darshan