Close

Chetan Kanase - The Birthday Boy

चेतनशेठ, अहो काय हे, आज वाढदिवस तुमचा आणि आम्हाला

असं टिलुशेठकडून कळतंय
,

वय लपवायचा प्रयत्न हा का लोकांनी तुम्हाला शुभेच्छा देऊ नये असं तुम्हाला वाटतंय?

तुम्हाला काहीही वाटो आम्ही तुमच्याबद्दल लिहिणारच,
मुहूर्तावर आलेल्या वाढदिनादिवशी वकिलांच शुभचिंतन हे होणारच!

आता संदर्भ गोळा करायला बुद्धीला जरा ताण द्यायला लागेल,
कारण अर्थातच आपली ओळख आत्ताआत्ताची नसून तब्बल तीन दशकांच प्रमाण आहे!

आठवतोय मला तो तुझ्या चौथीचा वर्ग भंडारे गुरुजींचा,
दुसरीतल्या दर्शनला बसवून घेतले होते तू तुझ्या वर्गात करून सौदा जबरदस्तीचा!

भीमसेन च्या नवसाने झालेला चेतन अशी तुझी ओळख होती,
ओवाळणीचा धूप मंडपात घेऊन येताना तुझी वेगळीच ऐट होती!

लहानपणी माझ्यासारखच सचिनवर प्रेम करणारा तू उत्तरार्धात ना जाणे का त्याचा दुर्मिळ क्रिटीक्स झालास,
तेंडुलकरांचा सचिन जाऊ दे पण तू मात्र लहानपणी नक्कीच आमचा सचिन होतास!

नदीच्या पलीकडून तू येताना दिसला की चेत्या आमच्याकडून खेळणार म्हणून दंगा उसळून जायचा,
शक्यतो पूर्ण इंनिंग ब्याटिंग करून तू ही त्या दंग्याला मान द्यायचा!

आठवतंय मला लहानपणी तुला तो आफ्रिकेचा गोरापान कलीनन आवडायचा,
त्याला फॉलो करून तू ही कव्हर च्या डोक्यावरून लीलया फटके मारायचा!

बॉलिंग मध्ये मात्र तुला तुझ्या करिअरच्या पूर्वार्धात जरा कुजवलंच गेलं,
चेत्या फेकी टाकतो म्हणून कायम तुला बॉलिंग करण्यापासून थांबवलं गेलं!

उत्तरार्धात मात्र तू शोएब स्टाईल ने त्या क्षेत्रात जोरदार पुनरागमन केलेस,
लांब बाभळीपासून पळत येऊन न दिसणाऱ्या वेगाने चेंडू टा(फे?)कण्याचे कसब तुला गवसले!

माझ्या बॉलिंग ला क्लोज किपिंग हि तू करायचा,
पप्याला दर एक दिवसाआड यष्टीचीतचा बकरा बनवायचास!

नारायण मंदिर आणि मॉर्निंग क्रिकेट हा तर आपल्यासाठी निरंतर आठवणींचे पारायण करण्यासारखाच इतिहास आहे,
त्यातली प्रत्येक आठवण आपल्यासाठी एकदम झकास आहे!

पाटलाने सलग दोनदा टिपलेले तुझे सेंटर असो किंवा असो पप्या आब्यात तू काड्या घालून लावलेलं भांडण,
अनफॉर्च्युनेटली सगळंच इथं नाही लिहता येणार मला कारण ठेवावं लागेल मला स्वतःवर शब्दांचं बंधन!

नुसत्या क्रिकेटच्या आठवणीच लिहायच्या झाल्या तर वेगळं एक पुस्तक व्हायला वेळ नाही लागणार,
त्यामुळं क्रिकेटवाल आपण भेटलो की बोलू इथं मात्र मी नाईलाजानं पुढं जाणार!

क्रिकेटसारखी अभ्यासातही तुझी ब्याटिंग टॉपक्लास होती,
तुझ्या सुंदर हस्ताक्षराची आख्ख्या पंचक्रोशीत चर्चा होती!

सहावीत एकवीस पुरवण्या लावायचा वेगळाच विक्रम तू केला होता,
गणितात शंभर पैकी शंभर मार्क मिळवून तू एक आदर्श सेट केला होता!

सातवीत प्याटेक्शन च्या कडक तपासणीमुळे विज्ञानाच्या साध्या चाचणी परीक्षेत तू नापास झाला होता,
तेव्हा चेतन कणसे पण नापास झाला म्हणून चर्चेला एक जबरदस्त विषय आख्या शाळेला मिळाला होता!

व्हॉलीबॉल, कबड्डी अन खोखो या तेव्हाच्या बाकी तिन्ही खेळातही तुझा प्रचंड दबदबा होता,
सिनियर असताना ज्युनियर ना अन ज्युनिअर असताना सिनियर ना तू या ना त्या कारणाने नडला होता!

हाहा अरे एवढेच काय तीन अन तेरा पाणीतही तुझा हात कुणी धरला नाही,
सुटला नसतानाही रम्मी दाखवनारा तुझ्यातला जादूगार आमच्या बापूला कळला नाही!

दहावीतला खिडकीत बसणारा चेतन आर एस देसाईंचा कमालीचा लाडका होता,
बाल्या, पम्या, पानाडे कंपनीचा म्होरक्याही होता!

सायन्स कॉलेजला गेल्यानंतर मात्र आपला टच कमी झाला,
तुझ्या विचारसारणीतही हळूहळू आमूलाग्र बदल घडत गेला!

सायन्स शाखेचा पदवीधर झाल्यानंतर तू सोशल वर्क चा मास्टरही झालास,
भरपूर वाचन करून तू विधविविध विचारप्रणालींचा अभ्यासही केलास!

त्या काळात तू पत्रकारिताही करायचास,
निरनिराळ्या विषयांना तुझ्या कलमातून वाचाही फोडायचास!

यातूनच तुला हळू हळू वकिलीचा मार्ग सापडला,
आणि आमच्या शाळकरी चेतनचा अडव्होकेट चेतन कणसे झाला!

मागच्याच वर्षी बार असोसिएशन वर निवडून आलेले वकिलसाहबांचे आज आता स्वतःचे ऑफिस आहे,
प्रशासन क्षेत्राचे अमाप ज्ञान असणाऱ्या चेतनशेठ ची ज्ञानसंपादनाची भूक मात्र कायम आहे!

साहेब, आठ दहा दिवसातच भीमाच्या दरबारात आपली समक्ष भेट होणारच आहे,
तेव्हा तुम्हाला आम्ही तुमच्या प्रकटदिनाच्या थोड्या बी लेटेड पण प्रत्यक्ष शुभेच्छा देणारच आहे,
लहानपणी माझा कराटेचा ड्रेस लपवून आठवतंय तुला तू वडापाव घेतले होते माझ्याकडून?
आता माझ्या या शुभेच्छांरूपी आठवणींचे कारण पुढे करून आम्हीही येऊन पार्टी घेऊ तुझ्याकडून!

प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा वकिलसाहेब!! तुमच्यातला तो आम्हाला भावलेला देखणा, हुशार, वाचक, लेखक, खिलाडू, खादाड, शौकीन, रंगेल, रगिल असा स्वतंत्र विचारसरणीचा देऊळप्रेमी, जेठालालप्रेमी चेतन दिलखुलासपणे जगत राहो!!

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...