Close

Yogesh Mundhada - The Birthday Boy

मालक हे जमिनीपासून सहा फूट उंचीच्या धडधाकट शरीराचे,

आजघडीला लाडके स्पोर्ट्स टीचर नामांकित गुरुकुल स्कुलचे!

व्यायाम आणि खेळ सरांच्या कायम पूज्यस्थानी,
मग कितीही लागू दे करायला त्यासाठी आपल्या घामाचे पाणी!

एकेकाळी राहिले होते ते विद्यार्थी डिजि कॉलेजचे,
आहेत कोच आज महाराष्ट् स्टेट बॉक्सिंग असोसिएशनचे!

योगायोगाने जणू सरांच्या नावातच आहे योग,
करतात आपल्या विद्यार्थ्यांवर तंदुरुस्तीचे विधविविध प्रयोग!

कैक शिष्य यांचे परफॉर्मर असतील स्टेट अन नॅशनल लेव्हल्सचे,
नाव रोशन करतात आपल्या गुरु आणि साताऱ्याचे!

असतील नाही म्हणले तरी चार पाच दान कराटेतेही स्वतःचे,
कित्येक ब्लॅक बेल्टधारी लाभार्थी असतील यांच्या मार्गदर्शनाचे!

व्यायामाने घटवलेले शरीर कडक असले तरी आवाज कमालीचा सॉफ्ट आहे,
गोड गळ्याच्या गायनाबरोबर सिन्थेसायझर वादनही यांचा एक प्रांत आहे!

हे सर्व असतानाच एक उद्योजक म्हणूनही भक्कम आहे यांचं अंग,
मुंदडा पेपर बॅग्ज उद्योग यांच्या व्यवसायाचा रंग!

योगेश सर, अर्थातच तुम्ही नीअर अँड डिअर आहात समस्त लाहोटींचे,
बोलायला खूप आहे पण थांबवतो हे चार शब्द तुमच्या शुभचिंतनाचे!

वाढदिवसाच्या धष्टपुष्ट शुभेच्छा योगेश सर!

Love & Regards

 

-D for Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...