Close

Bharat Marda - The Birthday Boy

साताऱ्याचा कनिष्ठ बंधू असलेल्या कोरेगाव चे निवासी
असलेले आमचे वरिष्ठ बंधू
,

स्कीम असो बिझनेसची किंवा आस असो फिरायची, असे प्रत्येक गोष्टीत संधीसाधू!

खेळताना कॅरम याचे स्ट्रायकर वर असते कमालीचे नियंत्रण,
अशा नजाकतीने सोंगट्या व्होलाकडे जातात जणू मिळाल्यासारखं हळदीकुंकूवाचं आमंत्रण!

कोरेगाव युवा माहेश्वरी युवांना दिशा देणारे नेतृत्व यांचे,
कोणालाही न दुखावता सर्वांना बरोबर घेऊन चालनारे स्वभावगुण ज्यांचे!

क्रिकेट वर करतात हे जीवापाड प्रेम उगाच नाही चांगलाहे यांचा अजूनही गेम,
'लाईव्ह IPL पाहून स्ट्रॅटेजि ठरवेन पण एसएमपीएल मध्ये साताऱ्याला हरवेन' हाच एक नेम!

ओझं नको म्हणून एक दोन ड्रेस मध्ये अख्खा राजस्थान पालथा घालून येतील हे शेठ आमचे,
एकदा शॉपिंग सुरु केली की मात्र सुट्टी न देता खरेदीचा ढीग रचणारे नाद यांचे!

'आक्षी निवडून घेणार पण रुचकरच खाणार' धर्तीवरचे चोखंदळ खवय्ये,
अर्ध्या रात्री उठून मित्रांना आहे त्या कपड्यावर मदत करन्यासारखे यांचे यारियल रवय्ये!

भलेही आज दुनियेने नोकिया ला 'नो' किया असेल पण यांच्यासाठी नोकिया 'येस'च आहे,
मोबाइल क्षेत्रात रुबाबाने सेवा पुरविण्याचा शेठचा आपला एक वेगळाच थाट आहे!

याद राखा यांच्या रागाचा पारा जळगाव च्या तापमानाप्रमाणे क्षणात खपकन वर जातो,
मात्र विसरू नका त्याहून दुप्पट वेगाने महाबळेश्वर च्या तापमानासम तो खालीही येतो!

मीटर जमिनीपासून फार फार तर साडे पाच फूट उंची यांची दाखवतो,
मात्र समाजातील उंचीचे माप मोजायला स्वतः मीटर ही कमी पडतो!

भरतशेठ, तुमची उंची लहान पण कीर्ती खूप महान आहे,
लिहून ठेवा तुम्ही नुसत्या कोरेगावचीच नाही तर उभ्या साताऱ्याची शान आहे!

Arjun, तू दिलेल्या रॉ मटेरियल मुळेच हे शक्य झालं याची मला निखळ जाण आहे,
शेठ, तुमच्या प्रकटदिनी आपल्या कलागुणांचं चिंतन करायला मिळणं हा माझ्यासाठी फार मोठा मन आहे, हा माझ्यासाठी फार मोठा मन आहे !

प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा भरतशेठ! तुम जिओ हजारो साल, जिसमे पेहलाही साल आये बार बार!

 

-D for Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...