Close

Shubham Sarada- The Birthday Boy

शुभम, आज आला बर्थ डे तुझा,
यायोगे सगळ्यांना हसवणाऱ्या तुला हसवायचा हा छोटा

प्रयत्न माझा!

असलास जरी तू ग्रुप मध्ये सर्वात छोटा,
निर्विवादपणे सर्व जाणून आहेत तुझ्यात दडलेला कलाकार आहे मोठा!


डझनभर लोकांना तू एकावेळी पुरून उरतो,
तुझ्या गॉड गिफटेड सेन्स ऑफ ह्यूमर ने तू त्यांना आरामात चावतो!

तुझे ते गोड गोड चावे भाव खाऊन जातात,
चावा घेतलेल्याचे तोंड पाडून इतरांना मात्र मनमुराद हसवतात!

हातात माईक घेतला की तुझ्यात जणू अल्ताफ राजाच घुसतो,
तुम तो ठेहरे परदेसी सारखे गाणे तू बेंबीच्या देठापासून आर्ततेने गातो!

फक्त गातच नाहीस तर तू कॉमेंटरी ही उत्तम करतो,
करवा-करवा-करवा सारखा जयघोष करून श्रोत्यांचा हसवून फडशा पाडतो!

शुभ्या तुझे अभिनय गुणही सर्वपरिचित आहेत,
गढूळाचं पाणी सारख्या मींटा दिड मिंटाच्या व्हिडिओतुनच ते झळकले आहेत!

एवढं सगळं असताना सगळे तुला एक क्रिकेटर म्हणूनच ओळखतात,
राग मानून घेऊ नको पण ते बरोबरच आहेत कारण माणसाचं पहिलं प्रेम हेच शेवटचं असतं, हे ते जाणतात!

शुभ्या तुझं क्रिकेटवरच प्रेम वादातीत आहे,
गोलंदाजी, फलंदाजी अन क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागातलं तुझं एवन प्रदर्शन साऱ्या पंचक्रोशीत प्रचलित आहे!

तुझ्यातला फिरकी गोलंदाज तर जगजाहिरच आहे,
पण सध्याच्या काळात लेगसाइड च्या फिल्डर्सना घाईला आणणारा अन स्लिप मधे टिचुक करून सिंगल धावणारा विस्फोटक फलंदाजही चांगलाच बहरात आहे!

म्हणून म्हणतो विसरून जा सांगलीच्या मालुने मारलेले फटके,
तू फक्त लक्षात ठेव तू आपल्या पंकज ला एकाच जागी एकाच स्टाईल ने टपाटप मारलेले सलग चार छक्के!

शुभम, कॅरम क्लब ची आहेस तू अतिमहत्वाची सोंगटी,
स्वीकार कर D for Darshan ची तुझ्यासाठी लिहिलेली शुभेच्छा ही छोटी!

वाढदिवसाच्या अरबो खरबो शुभेच्छा शुभम!

 

-D for Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...