Close

Abhishek Bhandari- The Birthday Boy

एबी, आज सत्ताविसावा दिवस जुलै चा,
एफबी सांगतय की आहे वाढदिवस तुझा,

म्हटले चला देऊ शुभेच्छा उत्सवमूर्तीला,
पण कन्फ्युज झालो या विचाराने,
की नक्की शुभेच्छा देऊ तरी तुझ्यातल्या कोणाकोणाला?

बी आर भंडारी नामांकीत फर्मचा मालक या नात्याने त्याचा कार्यभार सांभाळणाऱ्या मुरब्बी बिझनेसमनला,
का भंडारी-लिमये काँट्रॅक्टर्स अँड डेव्हलपर्स च्या त्या फोरसायटेड डेव्हलपर ला?

विविध स्मार्टफोन्सच्या एजन्सीज मॅनेज करणाऱ्या तुझ्यातल्या टेक्निकल डिस्ट्रिब्युटर ला,
का अत्यंत अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झालेल्या PMSHHM च्या त्या धडाडीच्या ऑर्गनायझर ला?

वर्षाकाठी एक नवा देश फिरून येणाऱ्या तुझ्यातल्या त्या टुअर ट्रेंडर ला,
का स्विस मध्ये गेला तरी तुझं स्केड्युल ब्रेक न करता मॉर्निंग रन करणाऱ्या त्या डाय हार्ड रनर ला?

अल्पावधीत स्विमिंग शिकून लगेच स्पर्धेतही पोहणाऱ्या तुझ्यातल्या शार्प टेक्नीकच्या स्वीमर ला,
का सध्याच्या घडीला विलक्षण ट्रेंड मध्ये असणाऱ्या त्या सायकल रायडर ला?

बॅडमिंटन कोर्टवर शटल ला ताकद अन नजाकत या दोहोंचा अनुभव देणाऱ्या बॅडमिंटनपट्टूला,
का ज्याला आपल्या टीम मध्ये घेण्यासाठी भांडणे लागतात अशा ऑलराऊंड क्रिकेटपट्टूला?

आपल्या काळ्या क्रेटामधून इन टाइम ग्राऊंड वर येणाऱ्या टाइम पंक्च्युअल ला,
का ती पंक्चुअलिटी ठेवायला आपल्या सेक्सी ऍपल ऑच ची मदत घेणाऱ्या ऍपल लव्हर ला?

कोणत्याही गोष्टीचा प्रॅक्टिकली विचार करणाऱ्या लॉजिकल थिंकरला,
का ज्याचा सर्वार्थाने अभिमान वाटावा असा लॉजिकल थिंकर ज्या मंत्रिमंडळाच्या महत्वपूर्ण पदावर विराजमान आहे त्या सातारा जिल्हा माहेश्वरी युवा संघटन च्या सचिवाला?

अँड लास्ट बट नॉट लिस्ट, 'आपण_चांगले_वागुया_आणि_चांगले_काम_करूया' हा आदर्श फ्याशनेबल करू इच्छिणाऱ्या तुझ्यातल्या त्या गुड ह्युमन बियिंग ला?

या प्रश्न केलेल्या तुझ्यातल्या प्रत्येक अभिषेकला या वाढदिवसाच्या अरबो खरबो शुभेच्छा अभी! येणारे हे वाढवर्ष तू जगणाऱ्या या प्रत्येक अभिषेकला द्यायला तुझ्यासाठी भरपूर सारा वेळ घेऊन येवो !!

 

-D for Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...