Close

Mahesh Gangatirkar- The Birthday Boy

महेशारती
जय महेश जय महेश जय महेश भावा

तु आमच्या सोसायटीचा राजबिंडा छावा!
आरती तुझी भार्या अन शांभवी तुझी छाया
प्रसाद साईचा मिळाला साथ तुझी द्याया!
जय महेश जय महेश जय महेश भावा
तु आमच्या सोसायटीचा राजबिंडा छावा!

कुशाग्र बुद्धिमान तू सरकारी कर्मचारी
घोळून प्रशासन पितो आज माहिती तुला सारी
स्वभाव प्रामाणिक तुझा वाखानन्या जोगा
याचवर्षी उत्कृष्ट कर्मचारी म्हणून सन्मान तुझा झाला
अशाच प्रगतीचा वास तुझ्या कामा मध्ये रहावा
तु आमच्या सोसायटीचा राजबिंडा छावा!

अन्वीचा असे काका जरी तिला तू जणू कृष्णाला नंद
लहानाहूनी लहान होणे याचा तुला छंद
खेळता बालगोपाळासंग होसी तू धुंद
पार्टीचे बील देताना तुझ्याहुनी होतो आम्ही मंद
असाच प्रेमवर्षाव तुझा आम्हावरी रहावा
तु आमच्या सोसायटीचा राजबिंडा छावा!

सकाळी उठूनी तू न चुकता फिरावया जासी
तुझ्या सहा फुटी देहाची काळजी तू घेसी
खाण्यापिण्याची हौस करी तू संपूर्ण शाकाहारी
शुद्ध वाणी, आचरणाचा देवाचा पुजारी
हा संग तुझा आम्हासंग निरंतर रहावा
तु आमच्या सोसायटीचा राजबिंडा छावा!

जय महेश जय महेश जय महेश भावा
तु आमच्या सोसायटीचा राजबिंडा छावा!

हैपी बद्डे महेशराव!!!

 

- D for Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...