Close

Harshad Sadawarte- The Birthday Boy

साताऱ्याच्या सुप्रसिद्ध केबीपी कॉलेज मधून सलग चार वर्षे

म्याडीच्या एका मिसळच्या पैशात डबल मिसळवर ताव मारत

मिळवलेल्या अभियांत्रिकीच्या पदवीचे मोरपीस टोपीमध्ये रोवलेले स्थापत्य अभियंते,

या पदवीला पुण्याच्या एमआयटी विद्यालयातून प्राप्त केलेल्या उच्य पदवीची जोड देऊन आपल्या शैक्षणिक विद्वत्तेची उंची एका विशीष्ट पातळीवर नेऊन ठेवलेले उच्च पदवीधर,

याच उच्य शिक्षणाच्या भक्कम पायावर स्वकर्तृत्वाने उभारलेल्या सदावर्ते अँड सन्स इंजिनीअर्स अँड काँट्रॅक्टर्स नामक उद्योगाचे संस्थापक एवं मुख्य कार्यकारी अधिकारी एवं सरकारी ठेकेदार,

अशा क्लिष्ट उद्योगाचा डोलारा सांभाळत विरंगुळा म्हणून जोपासलेला बॅडमिंटनचा खेळ प्रोफेशनली खेळणारे बॅडमिंटनपट्टू,

सायंकाळी पाच वाजता भोजन करून नऊ वाजता सम्राटचा वडा पाव, भैयाची पाणी पुरी, ऑल इंडियाची झटका भेळ फॉलोड बाय डबल आईस्क्रीम डायजेस्ट सोडा सारखा जंकाहार करणारे खादाड डायट काँशिअस,

क्रिकेट, चित्रपट, संगीत, पुस्तके यासारख्या विधविविध गोष्टींवर जीवापाड प्रेम करणारे कलारसिक,

अलौकिक तर्कशक्ती, अस्खलित संभाषण कौशल्य, असामान्य बुद्धीचातुर्य अन खोचक विनोदबुद्धीेचे असे साखरेसारखे गोड, मिरचीसारखे तिखट अन कैरीसारख्या आंबट स्वभावाचे आमचे जिवाभावाचे मित्र श्री हर्षद सदावर्ते उर्फ श्रीराम यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!

 

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...