Close

Deepak Navandhar- The Birthday Boy

तमाम सातारा माहेश्वरी युवांच्या ह्रिदयांवर अधिराज्य गाजवणारे माजी शहराध्यक्ष,

याच शहराध्यक्ष पदावर कार्यरत असताना आपल्या प्रचंड मेहनत अन कर्तृत्वाने थेट राज्यावर वर्णी लागून अखंड महाराष्ट्र माहेश्वरी संघटनेचा क्रीडामंत्री या नात्याने कार्यभार सांभाळलेले माजी क्रीडामंत्री,

या क्रीडामंत्री पदाला पूरक अशा जमिनीपासून सहा सव्वा सहा फूट उंचीच्या काटक, लवचिक, चपळ अशा ऍथलीट शरीरयष्टीचे मालक,

याच उंचीचा फायदा घेऊन लांब ढेंगा टाकत वेगवान गोलंदाजीचा मारा करणारे थंगड क्रिकेटचे तेजतर्रार गोलंदाज,

या उंचपुऱ्या व्यक्तिमत्वाला आपल्या बुलंद आवाजाची जोड देत आपले मोठमोठे विचार मोठमोठ्याने मांडून मिटिंगा दणाणून सोडणारे चिवट सामाजिक कार्यकर्ते,

आपल्या याच समाजकार्यातील अभूतपूर्व योगदानामुळे विधविविध खात्यांमध्ये आपले लागेबांधे असलेले वटपुरुष,

अशा या मारवाडी चौकाची शान असलेल्या ऐतिहासिक नवरंग कट्ट्याचा मान लाभलेल्या नवरंग सुटिंग शर्टींग नामक आलिशान इमारतीचे तहहयात मालक असलेले धुरंधर श्री दीपकशेठ नावंधर यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!

 

-D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...