Close

Dhiraj Kasat- The Birthday Boy

अगणित क्लिष्ट, जटिल, गुंतागुंतीच्या आर्थिक समस्यांचे आपल्या अलौकिक तर्कशुद्ध गणिती बुद्धीचा

शास्त्रोक्त वापर करून सचोटीने निराकरण करण्याची हातोटी ठेवत धीरज कासट अँड को या सातारा पंचक्रोशीतील नामांकित फर्मच्या अनुयोगाने असंख्य व्यावसायिक तथा नोकरदारांचा अर्थभार सांभाळणारे जणू एकार्थी अर्थमंत्रीच असतानाही वेळात वेळ काढून सातारा माहेश्वरी संघटनचा संघटन मंत्री या नात्याने सकुशलतेने कार्यभार सांभाळणारे सनदी लेखपाल,

आपल्या याच अर्थ क्षेत्रातील कर्तृत्वाने समस्त युवावर्गाकडून तज्ञ या पदवीचा सन्मान मिळविलेले व आजघडीला त्याच नावाने संबोधले जाणारे विशेषज्ञ

या मंत्रिपदांचा भार सांभाळत विरंगुळा म्हणून आपल्या अत्युच्च उंचीवरून क्रीजवर आदळणाऱ्या जादुई फिरकी चेंडूने भल्या भल्या फलंदाजांना चकविण्यात माहीर असलेले खुंखार टीमचे कोच व मार्गदर्शक

आमचे दिलदार दोस्त परममित्र श्री धिरजजी कासट उर्फ तज्ञ यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!

 

-D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...