Close

Vinod Marda- The Birthday Boy

साताऱ्यातील प्रतिष्ठित मर्दा घराण्याच्या त्रिमूर्तीतील तिसरी मूर्ती,

औषध विक्रीच्या माध्यमातून लोकसेवा करत प्राप्त करतेय जी कीर्ती !

औषधांना निव्हिया सारख्या सौंदर्यप्रसाधनांची जोड देऊन बनून राहिलेले सातारावासीयांच्या सौंदर्य वृद्धीचे कारण,
स्वतःच्या रूपाने विशीतल्या तरुणाला लाजवायलाही समर्थ असलेलं राजस, सुकुमार, देखण्याशा सौंदर्याचं उदाहरण !

ऐन तरुणाईत वर्षानुवर्षे तालमीत घाम घालून कमावलेल्या सदृढ शरीरयष्टीचे मालक,
आजही चारचौघींच्या काळजाचा ठोका चुकवू शकेल ज्याच्या दाट, काळ्याभोर, सिल्की केसांची पुसटशी झलक!

तुंबेच्या तुंबे मारणारे थंगड क्रिकेटचे विस्फोटक फलंदाज,
गोळीच्या वेगाने केलेल्या प्रहारांचा घंटा कोणाला येत नाही अंदाज !

बॉलिंग करताना सांगून टाकणार पहिला बॉल हमखास फुल्टोस,
एकदा लाईन सापडली की मात्र लागू देत नाही बॅट्समनला आस !

सातारा जिल्हा माहेश्वरी संघटनचा सांस्कृतीक मंत्री या नात्याने कार्यभार सांभाळणारे असे आमचे डार्लिंग व्यक्तिमत्वाचे दिलदार, तडफदार, ऐटदार मित्र श्री. विनोदभाऊ मर्दा यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा !

 

-D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...