Close
In Travel

Tour A Bendwadi

जेव्हा "आपण तू माझा फोटो काढ, मी तुझा फोटो काढतो" असे खेळतो,

अन मागून कोणीतरी आपल्या नकळत हे चाळे त्याच्या स्वतःच्या सेलमधून टिपतो!

काल हा अनुभव आम्ही तारळ्याजवळून जस्ट काही मैलांवर वसलेल्या बेंदवाडीच्या घाटात जगला. इथे शेअर केलेल्या फोटोंपैकी काही फोटो म्हणजे त्या अनुभवाचेच नमुने!

कोकणातील आंबा घाटालाही तोडीस तोड असावा असा हा फारसा कोणाला परिचित नसलेला बेंदवाडीचा घाट! दिवसभर आग ओकून इव्हीनिंग च्या टायमिंग ला शांत झालेला सूर्यनारायण ऐन हिवाळ्यात भरून आलेल्या ढगांचे मास्किंग कमी जास्त करत जेव्हा डोंगराआड जातो तेव्हा या घाटातून दिसणारा, त्या पश्चिमेला मावळणाऱ्या पूर्वेच्या देवाच्या तेजाने तेजोमय झालेला, अवघ्या नभाचा भगवा नेत्रदीपक नजारा हा निसर्गाचा अविष्कारच दर्शवतो!

पाठोपाठ दिसतो, कापलेल्या कैरी, कलिंगडाच्या फाका कोणतीही कल्पकता विचारात न घेता उलट्या ठेऊन रचाव्या अन त्या रँडम रचनेतून काहीतरी सांगू पाहणारी एक अर्थपूर्ण सुबक आकृती तयार व्हावी अशा आकृतीसारखा मोहक नजारा तो त्या पाच पन्नास डोंगररांगांचा, अन पुढले चार प्रहर त्यातल्या एका डोंगराआड दडून मागच्या चार प्रहरांची धगधग थंड करणारा टेम्पररी अस्त त्या सूर्यदेवाचा!

आहाहा!! तो माव??%Bशीपुरते बाय करत करतच इकडे सोबत चरायला म्हणून नेलेले बुटके चुरमुरे, गाठीयुक्त खमंग फरसाण अलॉंग वुइथ लिंबू, कांदा, धनिया, कोथिंबीर यांच्या प्रपोर्शनेट मिश्रणावर पाच पाच रुपयांच्या बिंगोच्या पुड्यांचा चुरा शिंपडून तयार ऐ??्शनेट मिश्रणावर पाच पाच रुपयांच्या बिंगोच्या पुड्यांचा चुरा शिंपडून तयार झालेल्या सुक्या भेळेचा त्या सुनसान घाटाच्या डांबरी सडकेवर बसून आम्ही सवंगड्यानी एकमेकांची मापे काढत, मिटक्या मारत आस्वाद घेतला! आता त्या भगव्या प्रकाशात मित्रांच्या संगतीत भेळेच्या प्रत्येक घासासोबत जगलेल्या आठवणी चघळत खाल्लेल्या त्या भेळेची अजूनही जिभेवर रेंगाळणारी चव कशी सांगू अन कशी लिहू?!

 

- D For Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...