Close

कोण कोण काय काय वाचतंय, बघतंय, ऐकतंय सध्या?

Ashutosh सर,

गेल्या आठवड्यात तुम्ही केलेला "कोण कोण काय काय वाचतंय,

बघतंय, ऐकतंय सध्या?" वाला हा प्रश्न माझ्या फीड मध्ये आलेला दिसला

आणि मुळात प्रश्नच आवडीचा वाटल्याने मी रेफरन्स साठी या ऍट्याच केलेल्या स्क्रीनशॉट प्रमाणे कंमेन्ट बॉक्स मध्ये लागलीच रिप्लाय ही केला.

नंतर तुमच्या या पोस्ट वरती शेकडो कमेंट्स ची बरसात होऊन ही पोस्ट एक पोस्टच न रहाता ते जणू एक काय वाचावं, काय पहावं अन काय ऐकावं याच मार्गदर्शन करणारं जणू एक छोटं पुस्तकच होऊन बसलं. त्या पोस्ट मध्ये तुम्ही कुठेतरी लिहिलेलं, "वाचणे हा लिहिण्याचा, ऐकणे हा गाण्याचा आणि बघणे हा जगण्याचा रियाज आहे" हे वाक्य ही खूप भावलं!

सर, तुम्ही मी दिलेल्या उत्तरातल्या मधल्या पॅरावर सविस्तर लिहायच्या केलेल्या आव्हानाबद्दल थँक्स! थँक्स या अर्थाने कारण त्याद्वारे तुमच्याशी थोडेफार इंटऱ्याक्षण करायचा हा ट्रिगर मला मिळतोय!

अर्थातच आपले कनेक्शन हे जेन्युअन व्हरच्युअल कनेक्शन आहे. काही वर्षांपूर्वी तुम्ही तुमचा लयपश्चिमाचा प्रयोग साताऱ्याच्या शाहूकलामंदिरात केला होता. आमच्याच साताऱ्याच्या निष्णात निवेदिका असलेल्या स्नेहलताईंनी ( Snehal Damle ) त्या प्रयोगाचे निवेदन केले होते.

त्या प्रोग्रॅमची संकल्पना, तुमचं सादरीकरण अर्थातच अवर्णनीय होतं, पण त्यातल्या त्यात माझ्या मनाला सर्वात जास्त भावलेला त्या प्रयोगाचा भाग म्हणजे तुम्ही गायलेलं मनमंदिरा तेजाने हे गाणं! बटरफ्लाय फ्लाय अवे चा बेस घेऊन! त्या गाण्याने हा दर्शनरुपी काजवा तात्काळ आशुतोष जावडेकरांकडे असलेल्या प्रतिभेला आकर्षित झाला होता आणि बसल्या जागेवरून त्याने त्यांना एफबी वरती सर्च करून फ्रेंड रिक्वेस्टही सेंड केली होती.

तेव्हा तुम्ही ती, मी तुमच्या साठी स्ट्रेंजर असूनही ऍक्सेप्ट केली होती. त्या दिवसानंतर आजपर्यंत तुम्ही पोस्ट केलेल्या विविध क्षेत्रातील पोस्ट्स माझ्या नजरेखालून गेल्या आहेत. मग ती पोस्ट तुमच्या स्वतः संगीतबद्ध केलेल्या अन गायलेल्या गाण्याची असो, तरुणाईच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या तुमच्या छापून आलेल्या लेखांची असो, तुमच्या सहजसुंदर प्रवासवर्णनांची असो किंवा किंवा तुमच्या मीशीत वावरणाऱ्या देखण्या रुपाला चित्रबंद करणाऱ्या सेल्फीज ची असो. ती प्रत्येक गोष्ट वाचणाऱ्याला काहीतरी शिकवून गेली आहे, साधा तात्काळ घेतलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याचा निर्णयही किती महत्वपूर्ण असू शकतो ही शिकवणच जणू माझी मला त्यातून मिळाली आहे!

असो, प्रश्नाचे उत्तर सोडून एवढे लिहिन्यामागचा उद्देश म्हणजे डॉक्टरसाहेब अर्थातच तुमच्याशी असलेली व्हरच्युअल मैत्री वाढवण्याच्या स्वार्थापोटी केलेला एक छोटासा प्रयत्न! तुम्ही हा मी दिलेला टॅग एक्सेप्ट कराल की नाही याचीही मला खात्री नाही. पण लॉटरी लागली तर लागली, चान्स घ्यायला काय जातंय! आजच्या तरुणाईचे रोलमॉडेल ठरावी अशी व्यक्ती आपल्या ओळखीची आहे हे सांगायला मिळणे, ही सुद्धा फार मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे!

तर मी सविस्तर लिहायच्या मुद्द्यावाले मी तुमच्या "सध्या काय बघताय" या प्रश्नाला दिलेले उत्तर : "मी काहीच बघत नाही सध्या, आजकाल ज्या गोष्टी हौशेने बघत असतो त्या गोष्टी आपल्याही नकळत कधी न पाहण्यासारख्या रॅदर न झेपनाऱ्या होऊन जातात हे देखील कळत नाही."

काही दिवस मागे वळून पाहायला गेले तर प्रश्नाला काहीतरी क्रिएटिव्ह उत्तर द्यावे या विचाराने इन्स्टंट आलेली रियाक्शन होती ही. तिला बेस होता तो मध्यंतरी हौसेने पाहत असलेल्या काही टीव्ही सिरियल्स चा! माझ्या नवऱ्याची बायको या सिरीयल चे कथानक माझ्या या विचाराच्या स्पष्टीकरणासाठी अगदी परफेक्त उदाहरण आहे. 'प्रेक्षक जे दाखवेल ते पाहतात' असेच जणू सिरीयल च्या पटकथा लिहिणारे गृहीत धरून चालतात. थोडीशी क्युरिओसीटी ताणली की झालं, भोळा भाबडा प्रेक्षक आपल्या वेळेची पर्वा न करता पाहणारच आहे आता पुढे काय मूर्खपणा दाखवताहेत ते!

खरतर या सिरिअल मध्ये राधिकाच्या सकारात्मक पात्रामूळे एक मस्त टच मिळाला होता वूमन एम्पॉवरमेन्ट चा! एक कंपनी रनर या नात्याने ते पाहुही वाटत होतं आणि वाट पाहून पहायलही जायचं. पण रसिकाच्या ( शनया ) एक्झिट च्या पायात असं काही वळण दिलं त्यांनी कथानकाला की मला आता लिहायला शब्दही सुचेनात. मी उत्तरात लिहिल्याप्रमाणे 'न झेपणारच'!

मला कळतंय की, इतकं दर्जेदार मटेरियल मार्केट मध्ये पाहण्यासाठी उपलब्ध असताना मीच अशा सिरियल्स च्या नादालाच कशाला लागाव मुळात! पण कितीही पुरुषप्रधान संस्कृती असली अन क्रिकेटचा अपवाद सोडला तर रिमोटचा मालकी हक्क हा महिलांकडेच असतो. मग रोज जे समोर दाखवलं जातंय त्याची कारण नसताना मापे काढायची आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा टीव्ही समोर तीच मालिका पहात, तीच मापे काढत पहिले पाढे पंचावन्न करायचे! आणि हे या एकाच मालिकेविषयी नाहीतर येऊन जाऊन सगळे दाखवले जाणारे फॅमिली ड्रामाज असेच!

खरंतर असं जास्त नकारात्मक वैचारिक लिखाण करून स्वतःचेच हात पोळून घेणे हे मला आवडत नाही. पण मी उत्तरच नकारात्मक दिलं होतं त्यामुळं त्याचं स्पष्टीकरणही नकारात्मकच झालं! यात, एक प्रश्न मला कायम पडत आलाय की जनतेने थेट अशा सिरियल्स मध्ये काम करणाऱ्यांना असे प्रश्न केले तर ही लोकं स्वतःचा डिफेन्स तरी कसा करतात?

साहित्याचा एवढा अमाप खजिना आपल्या अवतीभोवती पडलेला असताना, त्यात रोज नवनवीन भर पडत असताना, या चॅनेल्सवाल्यांनाही वर्षानुवर्षे त्याच त्या एकाच विषयाभोवती घुटफळणारी कथानकेच का सादर करू वाटतात?

फिल्टरिंग होऊन संधी मिळालेले पटकथाकार आपला ठसा उमटविण्यासाठी का नाहीत खरोखर दर्जेदार अन अर्थपूर्ण अशाच पटकथा सादर करत?

त्यांची नजर आणि दृष्टिकोन तर आम्हा प्रेक्षकांच्या नजरेपेक्षा कितीतरी पटीने चांगला असणार. हे असे माझ्यासारख्याना पडलेले प्रश्न प्रेक्षकाच्या नजरेने आपण लिहिलेले कथानक पाहताना त्यांना नसतील का पडत?

तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे असलेच पाहून जर लोकांचा जगण्याचा रियाज होऊ लागला तर जगताना तरी त्यांच्याकडून समाजाने काय अपेक्षा करावी?

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...