Close

राजाभाऊ एक नंबर!!....

राजाभाऊ एक नंबर!!
राजे तुमचा या वेशातील नुसता फोटो पहिला

आणि आमच्या मेंदूने बॅकप्रोसेसिंग करून झरझर इतिहास समोर मांडला!

आठवले ते दिवस जेव्हा नवतरुणच्या राजानामक या तरुणाची आम्हा शाळकरी मुलांमध्ये एक वेगळीच इमेज होती. मराठी पिक्चरमधल्या लक्ष्याला पण भारी पडल आपला राजा अशी ती मने कायम म्हणत होती. "हा असली भारी ऍक्टिंग करतो तर राजा पिक्चर मध्ये का जात नाही", असा प्रश्न आमचं निरागस मन कायम स्वतःला करायचं. अक्षरशः राजाचे आणि नवतरुण गणेश मंडळाचे सिन पाहायला मिळणार म्हणून आमचं मन गणपती गेल्यापासून गणपती बसेपर्यंतचा काळ, "यावर्षी सिन मध्ये काय पाहायला मिळणार" या प्रश्नाच्या उत्तराची विलक्षण आतुरतेने वाट पहात राहायचं.

कुठल्याच वर्षी या मंडळानेही त्याच्या प्रेक्षकवर्गाला नाराज नाही केलं. यांनी सादर केलेलं खणखणीत गाण्यांनी भरलेलं लोकप्रेमाचं खमंग खुसखुशीत मटेरियल लोकांना दरवर्षी भावलं. त्यातल्या त्यात जरा मोट्ठे होत गेल्यानंतर तुमचे दादा स्टाईल डबल मिनींग वाले पंच अजून जास्त भावत गेले. सिनची ती दहा पंधरा मिनिटं, आणि त्या दहा पंधरा मिनिटात मिळालेलं भांडवल डिस्कसून चघळायला त्या पुढचे दहा हजार मिनिटही कमीच पडू लागले.

भीमसेनची आरती झाली की आम्ही तडक बुधवार पेठ गाठायचो. येऊन तुमच्या विनोदी सादरीकरणांचा मनमुराद आनंद लुटायचो. स्टेज थिरकावणाऱ्या तुमच्या लेडीज पात्रांबरोबर आम्हीही उभ्या उभ्या थिरकायचो, तुम्ही मागे टन वाजून समेत फेकलेल्या त्या अस्खलीत विनोदांवर पोट धरून हसायचो.

आजही जसा च्या तास आठवतोय मला तो माकड बसलं गाडीला बोकड गेलं नदीला चा राजकीय पट, मराठमोळं गाणं हे शंभर नंबरी सोनं वर पुणेकरांच्या सुरेखालाही दाद द्यायला भाग पाडेल असे अस्सल मराठी लावणीनाट्य सादर केलेला राजा हाच तो नट, कड कड कडाड कडाड बडवीत येणारी कडकलक्ष्मी साकारणारा राजा अन तब्बल दोन तासाच्या अखंडित सादरीकरणात खुद्द आबासाहेबांच्या रूपाने रयते समोर येणारा राजा ही हा आमचा राजाच! यापलीकडे हवच काय आहे एका अभिनेत्यात?

राजा, तुमचं नवतरुण गणेश मंडळ हे आमच्या साठी कायमच चिरतरुण राहिलय आणि त्याच्या स्टेजवर आम्ही या आमच्या राजाला अभिनयातल्या राजाच्या रूपात पाहिलंय. राजाभाऊ, तुम्ही हे तुमचं अभिनयांग घेऊन छोट्या मोठ्या पडद्यावर झळकावं हे आम्ही निरागसतेने पाहिलेलं स्वप्न पूर्ण व्हायची अजूनही वेळ गेली नाही, खरतर अशी स्वप्ने पूर्ण व्हायला आजच्या वेळेसारखी दुसरी वेळ नाही!

सोशल मीडियाच्या कृपेने आज हे स्टेज तमाम कलाकारांना आपली कला सादर करायला बोटांच्या क्लीकवर हजर आहे, जिओच्या कृपेने या कलाकारांच्या कला पाहायला ऑडियन्स वर्ग ही ढीगभर आहे. आपल्याच गावाच्या गावाकडच्या गोष्टींनी याच संधीचे सोने करून आपला झेंडा लांब अगदी जोहान्सबर्ग पर्यंत मिरवला आहे. हा आदर्श नजरेसमोर ठेऊन तुमच्यातल्या त्या सर्वांग संपूर्ण अभिनेत्याला ब्रेक द्यायला समर्थ असणारा राजाभाऊ तुमच्या पेक्षा दुसरा जाणकार तो कोण आहे?

 - D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...