Close

Makarand Gosavi- The Birthday Boy

आपल्या अभिनय आणि लेखन कौशल्याच्या माध्यमातून

आपल्या छंदांनाच बनविले आपले प्रोफेशन,

त्यायोगे आपल्या साताऱ्याच्या कलात्मकतेचा डंका अखंड महाराष्ट्रभर पिटत असलेल्या प्रकल्पांमध्ये केले आपल्या अमूल्य योगदानाचे प्रोजेक्शन!

त्याच माध्यमातून आपल्या मातीतील कलाकारांना मिळालेल्या संधीचे बनला हा कारण,
साहित्यकलेच्या बागेमध्ये आपल्या निरीक्षणाची दारे चारी बाजुंनी सताड उघडी ठेऊन असामान्य अशा चिकित्सक वृत्तीने भ्रमण करत शोषून घेतलेल्या मकरंदातून करतो विधविविध अभिनित वा लिखित कलाकृतींचे साकारण!

कॅऱ्याकटर डिझाईन सारख्या नवीन कन्सेप्ट चा केला याने प्रयोग लागीर झालं जी सारख्या मालिकेत,
राहुल्या, भैय्या सारख्या पात्रांनी या कन्सेप्ट ला फुल्ल न्याय देऊन आणले तिला चर्चेत!

एक उत्कृष्ट लेखक हा नंतर झाला, आधी आहे हा हाडारक्ताचा अभिनेता,
रंगकर्मी, नाट्यकर्मी म्हणून ओळख असलेल्या मकरंदच्या अभ्यासू अभिनयाचा बाण सांभाळतो त्याचा विधविविध गुणीबाणांचा भाता!

नाटकवेड्या मकरंदने सातारकरांना नाटकांचे वेड लावण्यासाठी वाजविली होती तिसऱ्या घंटेची घंटा,
या तिसऱ्या घंटेच्या माध्यमातून आजही साताऱ्याचा रसिक अनुभवतोय दर्जेदार नाटकांच्या घंटा!

नाटकसिनेमांच्या वेडाने पछाडलेला मकरंद क्रिकेट च्या मागेही होता दिवाना,
आजही कोटेश्वर वाट पाहतय पहायला याला पुन्हा क्रिकेट खेळताना!

"मकरंद गो सा हित्य वी र हो" अशी जणू काही स्वतःच्या नावातून स्वतःला सेल्फ इंस्ट्रकशन देऊन त्यासाठी झपाटून करतोय हा काम,
मॅक, तुझ्या ठायी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी तू घेतलेल्या वा घेत असलेल्या मेहनत अन चिकाटीला आहे आमचा सलाम!

असे हे केवळ आपल्या फ्रेंडलिस्ट मध्ये आहेत या गोष्टीचाही एखाद्याला अभिमान वाटावा असे अवघ्या साताऱ्याच्या साहित्य क्षेत्राचा आज अभिमान असलेले आमचे साहित्य क्षेत्राशी लागिर झालेले स्वाभिमानी मित्र, लागिर झालं जी फेम श्री मकरंदसर गोसावी उर्फ मॅक यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!!

 

-D For Darshan