Close

Rajesh Khandelwal- The Birthday Boy

आमुचा राजा मंडईचा, आमुचा राजा मंडईचा
नोव्हेंबर ची अठावीस असे वाढदिवस याचा

आमुचा राजा मंडईचा!

शांत, निर्मळ, प्रेमळ, सगुण
जीव तयाचा असे आम्हांवर
किला ग्रुपचा जहाल मावळ, हा ब्राह्मण मानाचा ।।

आमुचा राजा मंडईचा, आमुचा राजा मंडईचा

नट गुणी हा खणाळीसाठी
उभा ठाकतो स्टेजावरती
अभिनय करतो भाव ओतुनी, उचली सीन हा गणपतीचा ।।

आमुचा राजा मंडईचा, आमुचा राजा मंडईचा

शेतकऱ्याची भूमिका हा करतो
नशा करुनी वढ पाचची म्हणतो
निरव्यसनी माणूस तसा जरी हा, करतो नाद हा पानाचा ।।

आमुचा राजा मंडईचा, आमुचा राजा मंडईचा

टेंडर घेतो, ब्यागा विकतो
घाम गाळुनी दाम छापतो
कुटुंब वत्सल पिता दिशाचा, अन नवरा ममताचा!

आमुचा राजा मंडईचा
नोव्हेंबर ची अठावीस असे वाढदिवस याचा
आमुचा राजा मंडईचा
आमुचा राजा मंडईचा
आमुचा राजा मंडईचा!!!

( With all due respect to soulful, blissful and melodious song Kanada Raja Pandharicha )

या काव्यातील उत्सवमूर्ती श्री राजूशेठ खंडेलवाल हे त्यांचा जास्तीत जास्त वेळ मंडई एरियात व्यतीत करत असले तरी त्यांचा वास हा त्यांच्या तमाम मित्रसमुदायाच्या हृदयात असतो!

ब्याग्ज, स्याक्स, बेल्टस, पत्रिका अन इतर तऱ्हेतर्हेच्या गोष्टींचा व्यापार करणारे राजूशेठ हे थेट दक्खनेतल्या हैदराबादचे गोरेपान चिकने चोपडे जावई असून ब्राह्मण या नात्याने प्रत्येक समाजकार्यात आहाराचा प्रथम मान मिळवतात!

हे स्वतःच्या दुकानात कमी अन पानाच्या अन चहाच्या दुकानात जास्त काळ दिसून येतात. यांच्या आयुष्यातील खऱ्या फॉर्मचा पिरेड तेव्हा असतो जेव्हा घरोघरी गणपती बसतो.

लहानपणापासूनच अभिनयांग असलेले राजूशेठ मंडळाचा प्रमुख, खंबीर, दर्जेदार नायक या नात्याने खणआळी गणेशोत्सव मंडळाचे स्टेज गाजवतात. यांनी गेल्या काही वर्षांमध्ये दुष्काळाने हवालदिल झालेला शेतकरी, दारू पिऊन टाईट होऊन डोळ्यांची बुब्बुळे डोळ्यांच्या बाहेर येईपर्यंत तिरकी करून समाजाला स्वच्छतेचा मेसेज देणारा वड पाच ची अशा दमदार भूमिका साकारून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे.

सुप्रसिद्ध किल्ला ग्रुप चे तहहयात सदस्य असलेले राजूशेठ बऱ्याच भिशांच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही आपल्या खांद्यावर सांभाळतात. व्यापाराच्या नावाखाली लांब लांब दौरे काढून फिरून घेणारे राजूशेठ जसे मित्रांमध्ये रमतात तसेच कुटुंबामध्येही जीव लावतात.

आमच्यासाठी म्हणाल तर आमचे मामेबंधु प्रशांतशेठ नावंधर यांचे लंगोटीयार म्हणून आम्हाला लहानपासून परिचित असलेले हे राजूशेठ नावानेच नाही तर त्यांच्या स्वभावाने अन कर्माने एक चालता फिरता राजामाणूसच आहेत!

वाढदिनाचे फ्रॉम दि बॉटम ऑफ हर्ट अभिष्टचिंतन राजूशेठ अर्थात Rajesh Khandelwal

वुइथ लव्ह अँड रिगार्डस

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...