Close

Prashant Amne- The Birthday Boy

नंदादीप जो सद् भावनेचा ।
आदर्श जो विवेकी कृतींचा ।।

त्याच्या ठायी जी सेवेची वृत्ती ।
अखंड तेवते ज्ञानदानाची ज्योती ।।

तंत्र - मंत्र कला दोन्ही अवगत ज्याला ।
यत्किंचितही गर्व याचा नाही तयाला ।।

वेड ते लागले फोटोग्राफीचे याला ।
कॅण्डीड फोटोशूट कराया बस सांगावे तयाला ।।

क्रिकेटचाही भयाण नाद केलाय याने ।
इनस्वीगिंग डिलिव्हरी अस्त्राने घेतलेत कैक बळी जयाने ।।

मित्रा देव मानी जगे हा सख्यांच्या आठवणी ।
रंगवी मेहफिली लावून चपखल गाणी ।।

समर्थापरी असे मन शुद्ध ज्याचे ।
खट्याळ होण्या भाग पाडी ज्यास प्रेम सवंगड्यांचे ।।

असा श्रीकृष्ण जो आम्हा अर्जुनांचा ।
प्रकटदिन आज त्या आमणेंच्या प्रशांतचा ।।

फक्त ज्यांच्या पाठपुराव्या अन मार्गदर्शनामुळे अवघ्या आठवीत असताना मी कॉम्प्युटर प्रोग्रामिंग च्या नादाला लागलो आणि जे आज माझं सर्वस्व होऊन बसलं,
त्या तारळे पंचक्रोशीतील विदयार्थ्यांना आपल्या 'साई कॉम्प्युटर्स' या सुप्रसिद्ध इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून गेल्या कैक वर्षांपासून संगणक साक्षर करणाऱ्या,
अन आजघडीला त्या जोडीला समर्थ बैठकीच्या माध्यमातून स्वतःसहित कैक लोकांना अध्यात्म साक्षर करणाऱ्या,
आमच्या गुरुस्थानी असलेल्या सवंगडी मित्र श्री. प्रशांतसर आमने यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!!

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...