Close

Tushar Lahoti & Yogesh Jategaonkar- The Birthday Boy's

डिसेंबरची आज पाच तारीख आहे,

काय योग हा ज्या दिवशी एकाच घरात दोन उत्सवमूर्ती आहेत,

कोणाला कशा शुभेच्छा देऊ हा माझ्यापुढे मोठा प्रश्न आहे,
त्यातला एक नात्याने माझा पुतण्या तर एक चक्क जावई आहे!

एकाने हेल्थकेअर क्षेत्रात आपलं वलय निर्माण केलंय
तर एकाने टिसीएस सारख्या कंपनीतून स्वतःला तंत्र क्षेत्रातला बादशहा म्हणून सिद्ध केलंय!

एक दिवसभर बोट आणि जिभेवर साखर ठेऊन मार्केटिंग चे घाट रचत असतो,
तर एक आपल्या तल्लख बुद्धीला धार लावून ऐटीत ऍनालिसिस करताना दिसतो!

उद्योगाच्या नावाखाली एक वरचेवर करत असतो दूरदेशी उड्डाण,
तर एकाने सहकुटुंब बसवलेय आपले विदेशातच बस्तान!

एक लहाणग्यांशी खेळताना होतो लहानाहुनी लहान,
तर मोठ्यांचे आदरातिथ्य करण्यात एक लावतो जी जान!

एकाला भारतात राहून कायमच वाटते आकर्षण विदेशाचे,
तर एक विदेशात राहतो पण कायम करतो चिंतन आपल्या देशाचे!

एकाने खास आपल्या आजच्या बायकोसाठी त्याकाळी एमबीये वगैरे केले,
तर एकाने याकॅडमिक्स मध्ये कायम टॉप करून आपले नाव कायम बोर्डावर झळकवले!

दोघांनाही भारी नाद आहे शेअर्स च्या ट्रेडिंगचा,
यांनी चारचौघात बसून आपला पोर्टफोलिओ नाही डिस्कस केला तर तो दिवस काय कामाचा!

दोघांनाही खाण्याची अन खाऊ घालण्याची भारी हौस,
फिरणे आहे जणू दोघांच्या रक्तात मग असो ऊन वा पाऊस!

दोघे आहेतच गुणी सुपुत्र आपल्या आईबाबांचे,
तसेच राजस जावईही आहेत आपापल्या सासरवाडींचे!

असे हे आमचे मुकुंदनगर मधील सुजय गार्डनच्या रत्न बिल्डिंग मध्ये स्थित असलेले NL हेल्थकेअर या उद्योगाचे मालक श्री तुषारशेठ लाहोटी अन सुजय गार्डन मधल्या याच घराचे जावई, अमेरिकेतील क्लिव्हलँड स्थित श्री योगेशजी जातेगावकर यांना त्यांच्या प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!!

-With love & regards

-D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...