Close

Sudeep Bhattad- The Birthday Boy

सुदीपभाऊ,
वाढदिवसाच्या आणि आपल्या वाढदिवशीच आपला लग्नाचा वाढदिवस यावा यासाठी मुहूर्त काढणाऱ्या महाराजांच्या अगदी शिव्या खाऊन हा दुहेरी योग आपल्या आयुष्यात घडवून आणल्याने आलेल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या आप्तेष्टांच्या वाढदिनी त्यांच्याशी संवाद सादणारी तुमची पत्रे आम्ही वाचतो. त्यामुळे तुमची आवड ओळखून भाऊ तुम्हालाही मी तशा पत्रातूनच शुभेच्छा लिहिण्याचा प्रयत्न करतो.

यामुळे दोन गोष्टी होतील. पहिली म्हणजे तुमच्या स्टाईल मध्ये वर्षातील तुमच्यासाठी असलेल्या #नऊबारा या सर्वात स्पेशल दिवसाचे शुभचिंतन होईल आणि दुसरी म्हणजे त्यायोगे मलाही भरभरून लिहिता येईल!!

सुदीपभाऊ, माझ्या लहानपणी तुमच्या राजपथा वरच्या #सिलेक्शन मधल्या एकाला एक लागून लावलेल्या असंख्य ट्युब्जचं खूप अप्रूप वाटायचं. आज घडीला काहीसं तसच अप्रूप तुम्ही एका मागून एक दुकान करत उभ्या केलेल्या तुमच्या सिलेक्शन सिरीजचं वाटतंय! एक वेल म्यानेज्ड बिझनेस कसा करावा याचं सीलेक्टेड उदाहरणच शेठ तुम्ही आमच्या समोर ठेवलंय!.

मी वेल म्यानेज्ड म्हणतोय कारण उद्योगाचा येवढा मोठा डोलारा आज उभा असताना भाऊ तुमच्याकडे #समाजकारण करायला जेव्हा हवा असेल तेव्हा खूप सारा वेळ असतो. समाजाचा कोणताही कार्यक्रम असो, तिथे प्रत्येक गोष्टीत पुढे वावरणारा सुदीप आम्हाला दिसतो. परवाच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे तुम्ही कोणाला तरी काहीतरी काम सांगता, तो ते काम पुढच्याला सांगतो, तो पुढचा ते तिसऱ्याला सांगतो अन मग शेवटी तो तिसरा पुन्हा तुमच्याकडे त्याच कामाची विचारपूस करतो! अन "सुरुवातही तीच आणि शेवटही तोच" असलेला सुदीप, तू समाजाचा निरंतर प्रकाशनारा दिपच भासतो!

अशाप्रकारे समाजकारणातील प्रत्येक गोष्टीचं कारण बनून सुदीपभाऊ तुम्ही #भजनी मंडळाच्या नादाने स्वतःला भक्तिरसातही न्हाऊन घेता. आपल्या दणकट हातांनी ढोलचीवर थाप मारत बुलंद आवाजात परमेश्वराचं गोड भजनही करता!
लेहर लेहर लेहराये रे म्हणत बजरंगबलीचा झेंडा मिरवता, मनात भरली पंढरी गात त्या विठ्ठलाची पंढरी ऐकणाऱ्याच्या मनात भरवता!

हा तुमचा भक्तिरस गणेशोत्सवात तर ओसंडून वाहतो. सेट उभा करण्यापासून पात्रांना #आवाज देण्यापर्यंतचं प्रत्येक काम त्या डझनभर दिवसांत मारवाडी गणेशोत्सव मंडळाचा हा खमक्या कार्यकर्ता करतो. तुम्ही कधी #निवेदक बनता तर कधी औरंगजेबाच्या भूमिकेत दिसता, आपल्या निवेदन वा #अभिनयकलेची हौस ही यायोगे तुम्ही फेडून घेता.

वयांत असलेल्या फरकामुळे भाऊ मला तुमचा भर तरुणाईतला खेळ माहित नाही, पण आज ही तुमची #बॅडमिंटन खेळाप्रति असलेली लगन आणि उत्साह पाहता तुम्ही खेळलेल्या हरएक खेळातले निश्नात #खेळाडू असणार यात तिळमात्र शंका नाही.

सुदीपभाऊ, कुणीही यावं आणि तुमच्या एवढं #तिखट खाऊन दाखवावं, अशा कोटीतलं खाणं तुमचं. पण एवढं तिखट खाऊनही जिभेवर ठेवलेल्या साखरेसम #गोड बोलणं अन वागणं तुमचं! मग समोरचा तुमच्या हुन लहान असो वा मोठा, त्याला कुठेही भेटला, कधीही भेटला तर तुम्ही तुमच्या वागण्या बोळण्याने त्याला योग्य न्याय देता आणि बहुदा त्यातूनच तुम्ही त्याला आपलंसं करता! उगाच का भाऊ तुम्ही #संघटन मंत्र्यांच्या नात्याने अवघ्या सातारा युवा माहेश्वरी संघटनेचं महाराष्ट्र प्रदेशवर नेतृत्व केलं अन तुमच्या लोकांना आपलं बनविण्याच्या याच स्वभावातून आपल्या युवासाथीना बरोबर घेऊन 'चलो आगे की ओर' चा नारा लावत अवघ्या महाराष्ट्राला या साताऱ्याची दखल घेण्यास भाग पाडलं!

आजही आम्ही कुठेही गेलो तर लोक आमची चौकशी करायच्या आधी सुदिपभाऊंची चौकशी करतात, यातूनच ते तुमच्या प्रति असलेलं त्यांचं प्रेम दाखवून देतात!

सुदीपभाऊ, व्यापार असो वा साहित्य, समाजकारण असो वा राजकारण, मैदान खेळाचं असो वा व्यासपीठ संगीताचं, अशा प्रत्येक क्षेत्रात तुम्ही तुमचा वकूब दाखवून दिला आहे, त्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा मिरवला आहे!

#रिबॉक ची टोपी आपल्या डोक्यावर,
#फास्टट्रॅक चा गॉगल ठेऊन आपल्या डोळ्यांवर,
#विम्बल्डन चा टीशर्ट परिधान करून आपल्या विशाल देहावर,
#आदिदास ची ट्रॅक चढवून आपल्या कंबरेवर,
#रॅडो चं घड्याळ बसवून आपल्या जाडजूड मनगटावर,
#पुमाचा शूज घालून आपल्या भक्कम पायामध्ये,
#ऍपल चा फोन ठेऊन आपल्या पॉकेटमध्ये,
#रॉयल ऐंफिल्ड च्या सीट वर विराजमान होऊन जेव्हा तुमचा #सहा फुट एकशे दहा किलो वजनाचा डोक्याच्या केसापासून #पायाच्या नखापर्यंत ब्रॅण्डमध्ये वावरणारा देह नजरेसमोर येतो तेव्हा लक्षात घ्या तो एक चालता, बोलता, फिरता एक झंझावातच भासतो!!

त्या चालत्या, बोलत्या, फिरत्या #श्री #सुदीपशेठ #भट्टड नामक झंझावाताला तुमच्या तमाम युवाबांधवांकडून या नऊ-बाराच्या अरबो खरबो शुभेच्छा!! तुमच्या या नेतृत्वाच्या छत्रछायेत आमचा वास निरंतर राहो हीच सदिच्छा,
तुमच्या या नेत्रत्वाच्या छत्रछायेत आमचा वास निरंतर राहो हीच सदिच्छा !!

- D For Darshan

 

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...