Close

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

भलेही नाही मला रस्त्यावर पडलेला इतरांचा कचरा उचलता आला,

मी मात्र स्वतः पब्लिक स्पेसेस मध्ये तसा कचरा न करणं म्हणजे राष्ट्भक्तीच!

भलेही नाही मला पाणी जिरवता वा वीज निर्माण करता आली माञ ही संपदा विनाकारण वाया न घालवणं म्हणजे राष्ट्भक्तीच!

भलेही नाही मला एखाद नवीन झाड लावता आलं माञ पर्यायाविना स्वतःकडून वृक्षतोड न करणं म्हणजे राष्ट्भक्तीच!

भलेही नाही मला भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवता आला माञ स्वतः भ्रष्ट आचरण न करून त्याला खतपाणी न घालणं म्हणजे राष्ट्भक्तीच!

भलेही नाही स्वतः निवडणुका लढवून नेतृत्व करता आलं मात्र निवडून दिलेल्या नेत्यांची मी उठ कि सूट मापे काढून त्यांचा मेंदू निष्कामि करून न सोडणं म्हणजे राष्ट्भक्तीच!

भलेही नाही स्त्रीजातीवर होणारे अत्याचार रोखता आले माञ मी स्वतः प्रत्येक महिलेचा माता भगिनी प्रमाणे आदर करणं म्हणजे राष्ट्भक्तीच!

भलेही नाही जातीवादाला आळा घालता आला तरी मी स्वतःहून जाती जातींमध्ये भेदभाव न करता गुण्या गोविंदाने राहणं म्हणजे राष्ट्रभक्तीच!

भलेही नाही समाजाला काही देता आलं माञ मी आपल्या कर्तव्याशी निरंतर कटिबद्ध असणं राष्ट्भक्तीच!

भलेही नाही मला इतरांच्या मती वा कृतींवर नियंत्रण ठेवता आलं तरी माझ्या मती आणि कृतीमुळे राष्ट्राच्या अस्मितेला किंचितही धक्का लागणार नाही याची खबरदारी घेणं हि राष्ट्भक्तीच!

भलेही नाही मला इतरांना चांगुलपणाचं महत्व पटवून देता आलं मात्र मी सर्वांशी चांगला व्यवहार करणं हि राष्ट्भक्तीच!

भलेही नाही मला आफ्रिदीच्या आईचा उद्धार करता आला मात्र पाकिस्तानला आपल्याविरुद्ध हरताना पाहताना डोळ्यांमध्ये आपोआप आनंदाश्रू येणं हि राष्ट्रभक्तीच!

भलेही नाही मला सीमेवर जाऊन देशाचं रक्षण करण्याचं अहोभाग्य लाभलं मात्र माझ्यामुळे कोणाला कसल्याहि प्रकारचा उपद्रव होणार नाही हा भाव मनी असणं आणि तत्सम आचरण करणं राष्ट्रभक्तीच!

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

खरं खूप सोप्प आहे देशप्रेम करणं, बस एवढंच करायचंय की आपण या राष्ट्रभूमीवर राहताना आपल्याकडून काही वाईट कृत्य घडणार नाही याची देशाच्या प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणं!

------------------------------------------
पोएटिक व्हर्जन!
------------------------------------------

भलेही नाही येत त्याला रस्त्यावर पडलेला इतरांचा कचरा उचलता,
एक राष्ट्रभक्त जगतो पब्लिक स्पेस मधे तसा कचराच न करता!

भलेही नाही येत त्याला पाणी जिरवता वा वीज निर्माण करता,
एक राष्ट्रभक्त करतो अशा संपदेचा वापर फक्त गरजेपुरता!

भलेही नाही आलं त्याला एखादंही झाड लावता,
एक राष्ट्रभक्त जगतो पर्यायाविना स्वतःकडून वृक्षतोड न करता!

भलेही नाही आला त्याला भ्रष्टाचारा विरुद्ध आवाज उठवता,
एक राष्ट्रभक्त जगतो स्वतः भ्रष्ट आचरण न करून भ्रष्टाचाराला खतपाणी न घालता!

भलेही नाही आलं त्याला स्वतः निवडणुका लढवून नेतृत्व करायला,
एक राष्ट्रभक्त नाही काढत निवडून दिलेल्या नेत्यांची उठ की सूट मापं त्यांचा मेंदू कुजवायला!

भलेही नाही आले रोखायला त्याला स्त्री जातीवर होणारे अत्याचार,
प्रत्येक महिलेचा माता भगिणीप्रमाणे आदर हा राष्ट्रभक्ताचा सदाचार!

भलेही नाही घालता आला त्याला जातिवादाला आळा,
स्वतः गुण्यागोविंदाने धर्मनिरपेक्ष राहतो असा राष्ट्रभक्त वेगळा!

भलेही नाही देता आलं त्याला समाजाला विशेष असं काही,
आपल्या कर्तव्यांशी निरंतर कटीबद्धता असे राष्ट्रभक्ताच्या ठाई!

भलेही नाही आलं ठेवता त्याला इतरांच्या मती वा कृतींवर नियंत्रण,
स्वतःच्या मती वा कृतीने मात्र राष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागणार नाही असं राष्ट्रभक्ताच वर्तन!

भलेही चांगुलपणामुळे नाही करता येत त्याला उद्धार आफ्रिदीचा,
पाकिस्तानला हरताना पाहताना आनंदाश्रू येणे हा नमुना त्याच्या राष्ट्रभक्तीचा!

भलेही नाही लाभलं अहोभाग्य त्याला सीमेवर जाऊन देशाचं रक्षण करण्याचं,
मात्र माझ्यामुळे कोणाला कसल्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही हा भाव मनी असणं अन तत्सम आचरण करणं हे वचन राष्ट्रभक्ताच, हे वचन राष्ट्रभक्ताच!!

- D for Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...