Close
In Travel

Trip To Marleswar

हिरवे हिरवे गार गालिचे
हरिततृणाच्या मखमालीचे

त्या सुंदर मखमालीवरती
सवंगडी हे खेळत होते

बेत ठरला मार्लेश्वरचा
निसर्गाविष्कार अनुभविण्याचा
चौदा मावळ एकत्र आले
कोकणकडे प्रस्थान केले

आंबा घाटात गाडी आली
निसर्ग पाहून थक्क झाली
एक एक करून खाली आले
सौंदर्याचे गुलाम झाले

हिरवाईची झालर ओढून
बसली होती एक टेकडी
सवंगड्यांना भुरळ पडली
सर तिज मग क्षणात केली

आजकालच्या ट्रेंड प्रमाणे
सेलकॅम खचाखच बाहेर आले
निसर्गाला वा कुणी स्वतःला
कॅमेऱ्यांमध्ये टिपून घेतले

पोज देऊ का निसर्ग पाहू
मनांमधे ही दुविधा झाली
गोड विलक्षण आनंदाने
चौदा मने ती न्हाऊन गेली

थर्टीन हंड्रेड डी ने टिपून घेतले
सवंगड्यांचे ते वर्तन
नजर होती आमने सरांची
शेअर करतोय

-D For Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...