Close
In Travel

आपला सातारा जणू काश्मीर महाराष्ट्राचा?

इथून तिथपर्यंतच्या हिरवळीच्या दरवळीने मनाला अक्षरशः भुरळ पाडणारे सौंदर्य माझ्यासारख्या लोकल नजरेने पाहताना

याला कुठे ठेऊ अन कुठे नको असं होत असेल तिथे ग्लोबल व्हिजिटर ची काय अवस्था होत असेल याची कल्पनाच करवत नाही!

ही दुतर्फा भरून पसरलेली हिरवळ जणू भेदत जाणारे रस्ते,

कमालीच्या सुबकतेने रचल्या गेलेल्या डोळ्यांच्या पारणे फेडणाऱ्या न संपणाऱ्या डोंगररांगा,

आधीच हिरवी झालर पांघरलेल्या या रांगांना पुन्हा पांघरून घालून लपवून ठेवायचा प्रयत्न करायला खाली उतरू पाहणारे धवल पांढरेशुभ्र ढग,

या सौंदर्याच्या सौंदर्यात भर घालणारे नदी-तलावाचे स्वच्छ संथ शीतल जल,

आणि या संपूर्ण सेट वर आपल्या लहरीप्रमाणे फोकस करून विधविविध इफेक्ट्स देणारा सूर्यप्रकाशाचा प्रखर ह्यालोजन!

दाखविणारा असा अदभुत आविष्कार निसर्गाचा,
नाही भासत हा आपला सातारा जणू काश्मीर महाराष्ट्राचा?

 

 

-D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...