Close

Pankaj Lahoti- The Birthday Boy

रुबाब याचा राजावानी, थाटात वावर सदा
उगाच म्हणती लोक का याला, किल्ला ग्रुपचा दादा!

रुंद खांद्यांचे शरीर भक्कम जेव्हा दिमाखात चाले
मावळ म्हणती दुरून "पहा आमुचे दादा आले"!

उचलून सदरा एक बाजूने बटन खोलूनी वरचे
नजर टाकत इकडे तिकडे येती दादा आमुचे!

लहरीनुसार दादांचे आमुच्या फिरावया जाणे सुरु होते
नको तिथे वाढू पाहणाऱ्या शरीराची जेव्हा जाण त्यांना होते!

वजन आणि खाणेपिणे यांचा संबंध दादांच्या ठायी नाही
एकदा टेबल वर बसला की बाह्या मागे सारून सुट्टीच देत नाही!

माशासाठी जसा अर्जुनाचा डोळा तसा दादांसाठी धंदा आहे
कस्टमर आहे तर आपण आहे हा विचार दादांचा पक्का आहे!

निर्णयक्षमतेला अपार मेहनतीची जोड पदोपदी दादांनी दिली
त्या प्रयत्नांतूनच पंकज क्रियेशन्स शोरूम ची भव्य इमारत आज खणआळीत उभी राहिली!

तरुणाईच्या आवडीचा आमचे दादा चोख ठाव घेतात
ट्रेंड नुसार प्रचलित वस्त्र आपल्या दालनी योग्य दरात उपलब्ध करून देतात!

मोठा उद्योजक होण्याचे स्वप्न उरी बाळगलेले दादा स्वभावाने वाहत्या निर्मळ पाण्याचा झरा आहेत,
हे मनाने हिमालयासम विशाल अन हृदयाने सागरासम खोल आहेत!

दादा तुमची तमाम स्वप्ने साकार होवोत हेच काय आमचे तुमच्या वाढदिनी शुभचिंतन आहे,
या शुभेच्छा वाचून तुमच्या द्रवलेल्या मोठ्या मनाने आमच्या हातावर पाणी पडो हाच काय तो आमचा स्वार्थ आहे,
दादा, हाच काय तो आमचा स्वार्थ आहे!! 

पंकज क्रियेशन्स चे मालक श्रीपंकज लाहोटी उर्फ दादा यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!!

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...