Close

Banty Bhattad- The Birthday Boy

तुम्ही लेग साईड ला कितीही घाम गाळून रन्स करा, 
मग हुक चा फटका मारून चौकी नाहीतर छगी मारा अथवा चेंडू

फ्लिक करून सीमापार धाडा, 
पायावर मिळलेला बॉल मस्त लेग ग्लान्स करा नाहीतर लॉंग ऑन च्या डोक्यावरून चेंडू मागे टाका, 
स्वीप मारा, प्याडल स्वीप करा किंवा धोनीसारखा हेलिकॉप्टर मारा,

यातल्या कुठल्याही शॉट ला,

बॉलर ला मुस्काडीत मारल्यासारखा मारलेला स्वेअर कट,
बॉलची शेवटपर्यंत वाट पाहून स्लिप मधून हळूच टिचूक करून चौका वसूल करायला मारलेला लेट कट, 
कव्हर मधून मोठ्ठाला गालिचा उलगडत निघालाय असा भासावा असा कव्हर ड्राइव्ह, 
किंवा लॉन्ग ऑफ च्या डोक्यावरून मारलेला ऑन दि राईज स्काय हिट 
यांसारख्या स्टम्प्स च्या उजव्या म्हणजेच ऑफ साईडला खेळलेल्या कोणत्याही फटक्याची सर कधीच येणार नाही.

पाहणाऱ्याच्या तोंडून ऑ लांबवून वदलेला शॉट हा शब्द खासकरून तेव्हाच ऐकायला मिळणार जेव्हा फलंदाज फटका ऑफ साईड ला मारणार!

अशाप्रकारचं 'शॉऑट' असं म्हणायला आम्हाला रोज बऱ्याच वेळा भाग पाडणारे, 
दोन प्लेयर्स ना घंटा आस न लागू देता त्यांच्या बरोब्बर मधून अगदी कोरून फटके मारणारे,
वयाच्या सातवी आठवी पासूनच प्रोफेशनल क्रिकेट शी आपली गांठ बांधलेले,
मुंबई दिल्ली सारखं एक्सपोजर वेळीच मिळालं असतं तर कोण जाणो आज फार वरच्या लेव्हल वरती क्रिकेट खेळताना दिसू शकले असते असे काळी दाढी ठेऊन टोपीत वावरणारे गोऱ्यापान वर्णाचे घमासान क्रिकेटचे खंबीर असे तंत्रशुद्ध फलंदाज,
मेडिकल इन्शुरन्स च्या माध्यमातून लोकांचे जीवनमान एकार्थी सुलभ करणारे समाजाचे हितचिंतक असले तरी कायम क्रिकेटर या नात्यानेच आमच्या नजरेत भरलेले,
परवाच कन्यारत्न प्राप्तीने धन्य धन्य होऊन बाप झालेले नांदेड चे जावई, नन ऑदर द्यान श्री रितेशजी शर्मा उर्फसोनू यांना प्रकटदिन तसेच कन्यारत्नप्राप्तीच्या अरबो खरबो शुभेच्छा!

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...