Close

जसे_पेराल_तसे_उगवेल

जसे_पेराल_तसे_उगवेल चे उत्तम उदाहरण म्हणजे कालचा माझा वाढदिवस, 

गेल्या वर्षभरात केलेल्या इन्व्हेस्टमेंट ची एका दिवसात सव्याज परतफेड मिळाल्यासारखाच जणू होता तो दिवस!

काल, 13 नोव्हेंबर 2018, 
गेल्या वर्षभरात सोशल साईट्स च्या दुनियेत या ना त्या माध्यमातून आपल्या शंभरावर आप्तेश्टान्ना दिलेल्या वाढदिवसांच्या अँटिक शुभेच्छांतुन त्यांचे व्यक्तिविशेष, स्वभावविशेष यांवर प्रकाश टाकून, त्यांचे वाढदिवस आपल्या विशेस नी विशेष करून चर्चेत राहिलेल्या डी फॉर दर्शन याने वयाची बत्तीस वर्षे पूर्ण करून तेहत्तीशीत प्रवेश केला.

अपेक्षेप्रमाणे बारा तारखेच्या मध्यरात्रीपासून विधविविध माध्यमांतून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला तो दुसऱ्या दिवशीच्या बालदिनाच्या शुभेच्छांसोबतच थांबला!

मग त्यामध्ये, 
कोणी त्याला गाणी डेडिकेट केली, 
कोणी त्याच्यावर त्याच्या कलागुणांवर प्रकाश टाकणाऱ्या कविता केल्या, 
कोणी त्याच्या वरती स्वतः गाणे रचले, 
कोणी त्याच्यासाठी मोटिव्हेशनल राईटअप्स केली, 
कोणी वेळात वेळ काढून त्याच्यासाठी सरप्राईज व्हिडिओज तयार केले, 
कोणी त्याच्यासाठी सरप्राईज बड्डे पार्टी आयोजित केली, 
कोणी केक घेऊन आले, 
कोणी याज ये गिफ्ट म्हणून शर्ट घेऊन आले, 
कोणी वाढदिवस म्हणून त्याला पहिली बॅटींग देऊ केली, 
गुलाबाचे एक फुल पंधरा वीस जणांनी देऊन त्याच्या सोबत फोटो सेशन केले, 
कोणी या कविमनाच्या नेत्याने स्वतःवर काव्य करून आपल्याला पाठविण्याची उत्स्फूर्त मागणी केली, 
बहुतांशांनी प्रत्यक्ष कॉल करून संवाद साधला, मेसेजेस करून आपल्या भावना त्याच्या पर्यंत पोहचवल्या,

मग या साऱ्या कौतुक सोहळ्यामध्ये,

कोणी त्याला लेखक बनवले, कोणी कवी म्हणून संबोधले,

कोणी त्याला कलारसिक केला तर कोणी साहित्यातील उगवता तारा म्हणून वर्णिला,

कोणी त्याच्यातला गायक गायला तर कोणी शेकड्याने गाणी तोंडपाठ असलेला गाणकिडा बनवला,

कोणी त्याला रिमिक्स, पॉप, रॉक सोबतच भजनातही तितकाच रंगणारा फ्लेक्झिबल संगीतरसिक केला,

कोणाला त्याच्यातला सचिन वर जीवापाड प्रेम केलेला ऑलराउंड क्रिकेटर भावला तर कोणाला तो दर्जेदार कॅरम प्लेयर म्हणून आठवला,

कोणी त्याला तो उत्तम बुद्धिबळपट्टू असल्याची आठवण करून दिली तर कोणी शॉर्ट सर्व्हिस मध्ये माहीर असलेला बॅडमिंटन लव्हर असल्याची प्रचिती दिली,

कोणी त्याच्यातला स्वतःबरोबरच आपल्या मित्रांना, आपल्या आप्तेष्टांना कॅमेऱ्यात कैद करून आठवणी बनविणारा फोटोग्राफर टिपला,

कोणी केलेल्या फोटोग्राफीचे संधी मिळेल तसे क्रिएटिव्ह सादरीकरण करणारा क्रिएटिव्हिटी ला आसुसलेला संधीसाधू जाणला,

कोणी त्याचा एक चांगले नेतृत्व म्हणून उल्लेख केला तर कोणी प्रत्येक गोष्टीत संधी शोधणारा बिझनेसमन ज्ञात करून दिला,

कोणी सध्या तंत्रक्षेत्रात कार्यरत असून हेल्थकेअर क्षेत्राशी नाळ जोडलेला मूळचा कापड व्यावसायिक आठवला,

कोणी फायनान्स सारख्या डोमेन मधल्या क्लिष्ट सॉफ्टवेअर्स च्या सेवा पुरविणारा आयतला टेक्नोक्रॅट केला,

कोणी त्याच्यातला वेब डिझायनर बाहेर आणला तर कोणी ग्राफिक्स एडिटर चिंतिला,

कोणाला तो कधीही न लाजणारा वाटला तर कोण त्याला चारित्र्य, स्वभाव अन कलेने ओळख निर्माण करणारे उदाहरण बोलला,

कोण शांत म्हणाले, कोण निगर्वी म्हणाले, कोण मितभाषी म्हणाले, कोण कुटुंबवत्सल म्हणाले, कोण सुस्वभावी म्हणाले, कोण कर्तृत्ववान म्हणाले, कोण रंगीबिरंगी कपडे घालणारे चॉकलेट म्हणाले तर कोण मित्रांच्या हृदयात राहणारे थेट मित्र म्हणाले!

आता गठ्ठयाने मिळालेल्या एवढ्या शुभेच्छांना त्यांना कुठे ठेऊ अन कुठे नाही असे झाले आहे,

त्या शुभेच्छांच्या हँगओव्हरने हँग झालेल्या डी फॉर दर्शन यांनी त्यांच्या आभार प्रदर्शनाचे काम माझ्यावर सोपवले आहे!

तर या ना त्या माध्यमातून वाढदिवसाचे शुभचिंतन करून सोशली चर्चिल्या गेलेल्या गुणांना येणाऱ्या काळांत एकत्रितपणे न्याय देण्याच्या वेगळ्याच चिंतेने कोम्यात गेलेल्या D For Darshan यांचेवतीने मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो अन स्वतःला आपणा सर्वांचा ऋणी समजतो. हेच आणि असेच प्रेम माझ्यावर आणि परस्परांमधे ही कसलेही अंतर न पडता निरंतर राहू द्या! ?

वाढदिनाच्या आभाराचा शेवट करताना उबंटू मधल्या त्या गाण्यांचे बोल लिहीन,

हीच माझी प्रार्थना अन हेच माझे मागणे 
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
भोवताली कधी दाटला अंधार दुःखाचा जरी 
सूर्य सत्याचा उगवू आपण देऊ याची खात्री 
तोवरी देई आम्हां काजव्यांचे जागणे 
माणसाने माणसाशी माणसासम वागणे!

धर्म, जाती, प्रांत, भाषा व्देष सारे संपू दे 
एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे 
अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे 
माणसाने माणसाशी माणसासम वागणे!

लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले 
पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे 
माणसाने माणसाशी माणसासम वागणे!

 !!!!!!व्हेरी मेनी थँक्स!!!!!! 

 - D For Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...