Close

Rajesh Lahoti- The Birthday Boy

राहिला होतास तू सातारा पॉली टेकनिकचा विद्यार्थी फार्मसीचा,
बाहेर पडून लावलास शोध सर्जिकल सारख्या वेगळ्याच क्षेत्राचा,

आज वयाची जवळपास तीन दशके तू सर्जिकल दुनियेच्या सेवेत घालवली, 
तुझेच अनुकरण करून न जाणो कित्येक जणांनी त्याच धर्तीवर आपली दुकाने चालवली,
कैक जणांच्या आयुष्याला त्या योगे एक भिन्न दिशा मिळाली, 
तुझा आदर्श नजरेसमोर ठेऊन ज्याने त्याने त्याच्यापरीने प्रगती केली, 
अन असंख्य जणांच्या पोटजीविकेचे कारण बनण्याची पुण्याई तुझ्या पदरी पडली!

आज सदाशिव पेठेतील तिरुपती सर्जीकल्स नामांकित भव्य शोरुमचा मालक तू, 
त्याहून मोठ्या अन हटके असलेल्या रायझन हेल्थकेअर नामक कंपनीचा डायरेकटर तू,
मोठी स्वप्ने पाहायचे धैर्य दाखवणे अन पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरवणे तुझ्याकडून शिकावे, 
निर्णयक्षमता अन सेन्स ऑफ ऍडव्हरटायजींग अँड मार्केटिंग चे धडे कोणी तुझ्याकडून गिरवावे, 
एंट्रीप्रूनीयरशीप ची बीजे तर तुझ्या ठायी तेव्हाच भिनली होती जेव्हा तू लहानपणी लायब्ररी सुरु केली होती, 
पाच आणि दहा पैसे भाडे घेऊन बाळगोपाळांना वाचायला तू पुस्तके उपलब्ध करून दिली होती!

एकदाघेतलेल्या निर्णयाचा कडक मेहनतीने तडक अंमल तू करत गेलास, 
अन यशाच्या शिड्या चढत राजस वैभवाच्या एका विशिष्ट ठिकाणी आज जाऊन पोहचलास, 
कितीही मोठा झालास तरी तुझा जीव मात्र छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिळासारखा तुटतो, 
चटण्या, कोथिंबीर, वांग्याची भाजी अन प्रेमाची कोशिंबीर यासारख्या गोष्टीतच तु छान रमतो,
शाळा कॉलेज मधले दूर गेलेले मित्र एकत्र आणण्याचा ध्यास घेऊन तू फिरतो, 
माझ्या लहानपणी पेजर वापरणारा तू वही पेन घेऊन त्यांच्याविषयीच्या महत्वाच्या नोंदी आवर्जून टिपतो,
काळ्या कलर वर तुझं जॅम प्रेम, कायम काळ्या कपड्यात दिसणारा तू, तुझी ऑडी गाडीही काळ्या कलरची, 
'राजेशशेठ' म्हणजे फुल जॉली माणूस अशी ओळख बनवली तू स्वतःची!

राजेशभैय्या, तुला तुझ्या प्रकटदिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझे चार शब्द इथेच संपवतो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच सोबत तिळगुळ देऊन साऱ्यांशी गोडगोड बोलही म्हणतो!

प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा बिग ब्रदर!! 

With love and regards  

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...