Close

Yogesh Mahajan-The Birthday Boy

आपल्या सवंगड्यांपासून दूर पार पाचशे पन्नास किलोमीटर
वर स्वतःचे सहपरिवार वास्तव्य, 

मात्र एवढ्या दूर असूनही व्हाट्सऍप च्या माध्यमातून पार पाडतात त्यांच्याशी आपली नाळ घट्ट जोडून ठेवण्याचे कर्तव्य!

हैदराबाद सारख्या मोघलांची सावली असलेल्या शहरात मिरवतात प्रखर हिंदुत्वाचा झेंडा, 
तुम्ही त्यांच्याकडे घेऊन जाल त्या विषयाला फिरवून घालणार धर्मनिष्ठेचा गंडा!

अहो त्यांच्या भीतीने सोडू शकत नाही साधी कोणी ग्रुपवर न्यू इयर ची पोस्ट, 
"आमचे नवीन वर्ष गुढीपाडव्यालाच" ही असे यांच्यासाठी मानाची गोष्ट!

आपल्या चोख नियोजनाने गेल्याच वर्षी अखंड हैदराबाद यांनी आम्हाला फिरवून दाखवला
नवरा बायकोच्या मिळून केलेल्या प्लॅंनिंग ने आम्ही तब्बल सत्तावीस जनांचा सवंगडी परिवाराचा गोतावळा सांभाळला!

सनातन अन संघाचे खंदे समर्थक असलेले हे दासबोधाचे संस्कारही आपल्यावर घेतात,
आपले वागणे, बोलणे अन आचरण यांतून या सर्व गोष्टींतून घडलेले संस्कार दाखवूनही देतात!

आपला मुलगा पार्थ याच्याशी यांचा संवाद म्हणजे भासे कृष्णाचा अर्जुनासंगे संवाद,
केवळ या पारदर्शक संवादातूनच त्यांनी आपल्या मुलाला लहान वयातच मॅच्युअर केलंय ही बाब सत्य असेल निर्विवाद!

आपल्या भर यौवनात पॉल अॅडम्स सारखी ऍक्शन करून लांब रणप घेऊन चेंडू किपरच्या डोक्यावरून मागे टाकण्यासाठी हे प्रसिद्ध होते,
जरा कमी शाहरुख खान सारखे दिसणारे आमचे योगेशराव आपल्या असंख्य नावांनी मित्रमंडळीत प्रचलित होते!

आपल्या व्यवसायाविषयी कमालीची गोपनीयता असलेले, 
बहुदा सिक्रेट एजंट म्हणून काम करत असल्याचा कधी कधी भास देणारे, 
देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातले येनकेण कारनाणे शुद्ध शाकाहारी मीठ चाखलेले,
हैदराबाद भूमीत हौसेने सीताफळाची बाग फुलविणारे,
सवंगडी बद्डे पार्टीज चे जनक,
फेसबुक वर आपल्या एक दोन नाहीत तर तब्बल पाच प्रोफाईल्स असलेले,
तारळ्यातील सुप्रसिद्ध महाजन घराण्याचे धाकटे राजकुमार, उंब्रजच्या सुप्रसिद्ध घुटे घराण्याचे ग्लॅमरस जावई,
आपल्या मित्रांचे स्वराज्याच्या दक्खनमध्ये धडधडत असलेले काळीज,
श्री योगेशशेठ महाजन उर्फ भरपूर यांना प्रकटदिनाच्या त्यांच्या हातावर भगव्या रंगाचे खूप सारे तिळगुळ देऊन गोड गोड शुभेच्छा!! 

With love & regards  - D For Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...