Close

Pankaj Rathi - The Birthday Boy

मालक पोवई नाक्यावरच्या सुप्रसिद्ध हिरामोती शोरूम चा 
डोक्यावर निवारा सदर बाजारातील भव्य पुर्ती बंगल्याचा 

छंद याला सीट खाली गाड्या बदलून कायम सीट बदलण्याचा 
ज्याचा नाद कुणी नाय करायचा असा पंकज आमचा राठींचा!

व्यापारी जरी हा कपड्यांचा करतो जुगाड शंभर भानगडींचा 
काउंटर वरती बसून दिवसभर फ़ोनाफ़ोनीने धंदा करे तर्हेतर्हेचा
कुठून तरी चार पैसे सुटले पाहिजेत असा साधा नियम याचा 
ज्याचा नाद कुणी नाय करायचा असा पंकज आमचा राठींचा!

टाईटप्यांटस् फिट्ट टीशर्टस् असतो झगमगाट रंगीत कपड्यांचा
फुल तयारीने झोकून देनारा स्वभाव जिगरी या पटठयाचा
ध्यास रोज एक तरी फोटो सोशल वॉल्स वर झळकवायचा
ज्याचा नाद कुणी नाय करायचा असा पंकज आमचा राठींचा!

सकाळीघेतलेला मोबाईल संध्याकाळी ही हा विकू शकतो
चेन वरखाली करावी इतक्या सहजतेने चैनी हा करतो
असा रंगीत, दिलदार, इलेक्ट्रिक माणूस शोधून नाही सापडायचा
ज्याचा नाद कुणी नाय करायचा असा पंकज आमचा राठींचा!

स्पिन टाकतो म्हणून मी आवर्जून याच्या बॉलिंग ची वाट पहातो
पण बिलंदर बॉलर हा आपल्या फिरकीने बऱ्याचदा चकवतो
उत्तम ऑलराऊंडर हा आहे निस्सीम भक्त क्रिकेटचा
ज्याचा नाद कुणी नाय करायचा असा पंकज आमचा राठींचा!

एसएमपीएल मध्ये स्वतःची वेगळी टीम घेऊन हा खेळतो
मग ब्याटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, किपिंग सबकुछ पंकजच असतो
पण अलीकडे जरा लागलाय नाद याला सायकलिंगचा
ज्याचा नाद कुणी नाय करायचा असा पंकज आमचा राठींचा!

वयाने जरी असला लहान तरी आहे याचे कर्तृत्व महान
समाज अन आपल्या मित्रसमुदायात शेठचे आगळेवेगळे स्थान
असा हा भावासम मित्र आमुचा बहुरंगी व्यक्तिमत्वाचा
ज्याचा नाद कुणी नाय करायचा असा पंकज आमचा राठींचा!

असे हे एकदम लेटेस्ट मध्ये एकाच दिवशी दोन मुलांचे बाप झालेले बाप माणूस, 
त्याच खुशीमध्ये आपल्या अवघ्या घमासान रसिक मित्रसमूहाला एखाद्या रंगीत शहरात नेऊन जंगी पार्टी देण्याचे धुंदीत आश्वासन दिलेले छंदी नेते, 
आपल्या शब्दांना जागणारे अन तमाम स्नेहीजनांची हौस करणारे हौसी कलाकार, 
सातारा जिल्हा माहेश्वरी युवा संघटन चा क्रीडाप्रमुख म्हणून कार्यभार सांभाळणारे माजी शहराध्यक्ष श्री पंकजजी राठी यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!! 

With love & regards

- D For Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...