Close

Nilesh Wagdole - The Birthday Boy

मिशीत वावरणारा सहा फुटी वाघ हा तारळे खोऱ्यातील सुप्रसिद्ध वागडोळे घराण्याचा,

आपल्या हाती रिमोट कंट्रोल घेऊन गोष्टी मॅनेज करणारा एकेकाळचा बादशहा व्हीनस कॉर्नरचा,
बहुचर्चित, बहुआयामी नायक हा हनुमान पेठ गणेशोत्सव मंडळाच्या स्टेजचा,
राहून राहून गम्मत म्हणून इतरांच्या खोड्या किंवा मापे काढून हसायचा अन हासवायचा छंद या साहेबांचा!

अतिशय लहान वयात शेठ पडले व्यापारात,
आले घेऊन नाविन्य हे तारळ्यातील स्टेशनरीच्या बाजारात,
गोड गोड बोलणारा हुशार व्यापारी हा अल्पावधीत स्थानापन्न झाला होता ग्राहकांच्या मनात,
अभ्यास आणि अनुभवाच्या जोरावर उत्तरोत्तर झाला मार्केटिंग मध्ये निष्णात,
तोडून टाकली सीमा याने एका जागेवर बसून करण्याच्या धंद्याची,
उपजत मार्केटिंग च्या गोडीने लागली ओढ याला एजन्सी लाईनची,
या ओढीतूनच झाला भाऊ आमचा डिस्ट्रिब्युटर कैक कंपन्यांचा,
आज नागठाणे उद्या कराड करणारा फिरता भवरा अखंड सातारा जिल्ह्याचा!

दोन कन्यारत्नांचा बाबा हा मनाने आतून बाहेरून निर्मळ,
समर्थ बैठकींच्या मार्गदर्शनाने उकलतो अध्यात्माचा तळ,
दिलदार स्वभाव अन तल्लख विनोदबुद्धीचा हा अवलिया खोडसाळ,
करतो वाढदिनाचं अभिष्टचिंतन चिंतून याच्यासाठी सुख अन समाधान सदासर्वकाळ!!

प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा निळूशेठ!! 

With love & regards 

- D For Darshan

 
 

 

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...