Close
In Travel

Trip To Velneshwar Beach

एक कमी डझन,
डेस्टिनेशन कोकण,

रिपब्लिक डे हॉलीडेचे कारण,
केले सव्हीस जानेवरीस मार्गक्रमण,
कोयनेच्या देवराईत झाले चहाप्राशन, 
नऊला केले वेळणेश्वरच्या किनाऱ्यावर आगमन, 
हॉल चा ताबा घेऊन केले क्वालिटी जेवण, 
ढेकर्स देत केले समुद्रकिनार्याचे परीक्षण, 
काळ्याकुट्ट अंधारात झाले रग्गड फोटोसेशन, 
बीचच्या रेतीत मारीले बस्तान, 
न ठेवीता काळ, वेळ, अंधाराचे भान, 
पेटत होती समोर शेकोटी छान, 
फक्त दुरून पाहून घेतले समाधान, 
समोर तुडतुड करत एक खेकडा आला, 
खेकड्ड्याने सवंगड्यांमधला कीडा जागा केला, 
न पिताच नुसत्या वातावरणाची धुंदी चढली, 
नसलेल्यांची मापे निघायला सुरुवात झाली, 
वाढत्या अंधारासोबत विनोद कमरेखाली जाऊ लागले, 
रंगलेल्या गप्पांना पूर्णविराम देऊन सारे हॉलमध्ये गेले, 
हॉलमध्ये कोणाला तरी ब्लूटूथ वर गाणी लावायची खाज आली, 
ती खुजली इतरांनी त्याला खाजवून खाजवून हाणून पाडली, 
टिंगल टवाळ्या करत एक एक करत मंडळी झोपली, 
मध्यरात्री दोनच्या प्रहरी रिसॉर्ट मधली लाईटच गेली,
काळोख्याखोलीत काहींच्या घोर घोरण्याने काहींची झोप उडाली
या घोर अंधारातच सकाळ उजाडली,
चला चला बीचवर जायची वेळ झाली,
बीचवर जायच्या आधी दूर जाऊन बिस्किट्स सोबत चहा ढोसला
दोन इन्स्टॉलमेंट्स मध्ये समुदाय समुद्रावर पोहचला,
निर्जन बीचवर आमचेच राज्य होते,
चार दोन वाटसरू सोडले तर औषधालाही कोणी नव्हते,
एक स्टम्प रोवून बीच क्रिकेट सुरु झाले,
समुद्राच्या मुलायम रेतीत सवंगडी मनमुराद खेळले,
बीचवर घाम गाळल्यानंतर लाटांवर झुलायची वेळ झाली,
दीड दोन तास समुद्राची मनसोक्त मजा लूटली,
देहाला आलेली सारी क्षिणता त्या खाऱ्या पाण्यात विरून गेली,
स्वच्छ पाण्याने न्हाऊन पुढच्या प्रवासास मंडळी सेट झाली,
वेळनेश्वराच्या दारी दर्शनाला आली,
दर्शन घेऊन समुद्रकिनारी पॉश रिसॉर्ट मधे जेऊनही गेली,
जेवणानंतर तिन्ही चार चाकींनी अंजनवेल कडे कूच केली, 
नजरेमध्ये गोपाळगडची आकृती आकार घेऊ लागली, 
तीस पस्तीस किमी चे अंतर अर्ध्या पाऊण तासात कटले, 
शार्प वळणांचे उंच निमुळते रस्ते कापत सारे गडाखाली आले, 
गोपाळगडाच्या तटबंदीवरून अथांग सागराचे दर्शन घेतले,
थंडगार वाऱ्याच्या झुळुकांनी अवघी मने थंड झाली,
एका ऐतिहासिक वास्तूभेटीची नोंद सवंगड्यांच्या नोंदी झाली,
गड उतरून अंजनवेलचा दीपस्तंभ मंडळी चढली,
सिग्नल्सवर रिलेटेड नेव्हीवर्किंगच्या माहितीने ज्ञानात भर पडली
दिपस्तंभाच्या पायथ्याशी असलेल्या टाळकेश्वराचे दर्शन घेतले,
तिथून निघून डायरेक्ट चिपळूणच्या अलीकडे चहाला थांबले,
इव्हीनिंग टाइमला चहा विथ मलई बिस्किट्स खाया मजा आली
ती मजा घेऊन मंडळी चिपळूण च्या क्वालिटी बेकरीत थांबली,
साऱ्यांची टोस्ट खारी केक बिस्किट्स ची जोरकस खरेदी झाली
घाटामध्ये वेगवेगळ्या गाड्यांत वेगवेगळ्या विषयांत हात गेले,
चर्चांच्या ओघात होहो म्हणत कोयनाही आले,
ठरल्याप्रमाणे देवराई मध्ये मस्त दणकून जेवण केले,
जेवणासोबतच छोट्याशा 1-डे हॉल्ट ट्रिपचे आभारप्रदर्शन झाले
1 गाडीने तारळे, 1 गाडीने कराड तर 1 गाडीने सातारा गाठले,
काल गेलो अन आज आलो, अशी कुठं ट्रिप असती व्हय म्हणत 'मिसिंग' वाल्या भावनेने सारे आपापल्या घरी झोपी गेले! 

- D For Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...