Close

Rahul Sarda - The Birthday Boy

गोरापान वर्ण अन काळ्याकुट्ट दाढीची उंचपुरी शरीरयष्टी यांची
आदमीच कुल असल्याने ती जरा काळजीच घेते थंडीची!

जिथे जाणार तिथे अल्पावधीत सारी सूत्रे घेणार आपल्या हातात,
सूत्रे हातात आल्यानंतर यांचा तिथला वावर असतो फुल थाटात!

फिरायला गेल्यावर काडीपेटीपासून भांडी घासेपर्यंत सारे स्वतः करणार,
ते करताना यांची एकसाईटमेन्ट अन उत्साह पार शिगेला असणार!

क्वालिफिकेशन ने जरी ऍडव्होकेट नसले तरी चालीबोलीतून हे सारडांना शोभणारे वकिलच आहेत,
आज याचं लफडं मिटव, उद्या त्याचं मिटव सारखे खेळीमेळीचे प्रयोग यांना नित्यनेमाचेच आहेत!

स्वतः दिवसभर कापड, पडदे अन तत्सम साहित्य विकत असले तरी हरएक धंद्यात यांना इंटरेस्ट असतो,
प्रत्येक धंद्याचा आपल्या परीने अभ्यास करत त्यांवर यांचा तर्कवितर्क चालतो!

गरीब श्रीमंतांपासून अबालवृद्धांपर्यंत प्रत्येक क्षेत्रातल्या यांच्या ओळखी निघतात शंभर,
कोणतेही काम घेऊन जावा तुम्हाला त्याचे सोल्युशन मिळणार तत्पर!

म्युझिकल कॅरॅक्टर हे जॅम फॅन आहेत विद्या ओक्स सारख्या ढिंच्याक म्युझिकचे,
इंग्लिश गाण्यांवर ठेका धरणारे कानांवर अत्याचार समजतात जेव्हा कानी पडतात बोल जुन्या हिंदी गाण्यांचे!

सिनेमागृहाचाही खुळा नाद करणारे एक चांगला पिक्चर यांचा सुटत नाही,
थ्रिलर, ऍक्शन मुव्हीज चा यडा फॅन आहे हा आमचा भाई!

मूठभर ड्रायफ्रुट तोंडात कोंबून हे सकाळी ग्राऊंड वर खेळायला येतात,
इतरांच्या म्हणण्याप्रमाणे खेळ कमी अन कारणेच जास्त सांगतात!

आक्रमक, खुंखार शैलीचे व्ही मध्ये खेळणारे फलंदाज हे रस्त्यावर बॉल मारायचे स्वप्न घेऊनच फलंदाजीस उतरतात,
एकेकाळी स्नूकर चे फॅन असलेले एकदा सुराला लागले की बॉल ला भन्नाट टाईम करतात!

आजरोजी सातारा माहेश्वरी युवा संघटन च्या अध्यक्षपदी आहेत शेठ विराजमान,
समस्त युवा वर्गाचा आहे हा चालता, बोलता, फिरता अभिमान!

असे हे बहुरंगी गुणांनी नटलेले, छोट्या छोट्या विनोदांवर खळखळून हसणारे, लहान वयात उच्चकोटीची अनुभवप्राप्ती केलेले, कामयाब, कर्तबगार, स्वछन्दी, लेटेस्ट मध्ये पुत्ररत्नप्राप्तीने बाप झालेले बाप माणूस, सारडा वुलन हाऊस चे हौशी मालक श्री राहुलजी सारडा यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा, त्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ काढून या संपूर्ण शुभेच्छा वाचाव्यात हीच काय ती तोकडी अपेक्षा!! 

With love & regards 

D For Darshan

 
 

 

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...