Close

Harshad Majgaonkar - The Birthday Boy

जय देव जय देव जय हर्षद देवा
ना पाहिला कधी दूजा तुजसम भावा, जय देव जय देव!

पायाची तिढी करतो ठेऊन मिशीवर हात
सर्वां निरीक्षण चाले खुर्चीवर बसुनी थाटात
मस्त इनशर्ट करुनी रहासी तू खट्ट
मिशी तुझी शोभे तुझ्या रूबाबास फिट्ट, जय देव जय देव!

माजगावकर गॅरेज तुझे राज मंदिर
ख्याती त्याची आज पसरलेय सर्वदूर
पुरवी वाहनसेवा करी त्यांची देवघेव
चाले काम शिस्तीत न घेता कसलाही लोड, जय देव जय देव!

बादशहा विनोदांचा तू दिसे सदा हसमुख
आनंद घ्यावा आनंद द्यावा हाची नियम प्रमुख
किस्यावर किस्से सांगी हातावर टाळी देऊन
हमखास हसत राहतो ऐकणारा पोट धरून, जय देव जय देव!

खेळांवरही देवा तुझी श्रद्धा अफाट
त्यातल्या त्यात आवडी तुला जास्ती क्रिकेट
फिल्डिंग करायला नको म्हणून होत नसशीस आऊटं
चौफेर फटकेबाजी पाहून करायचा बॉलर शाउट, जय देव जय देव!

खाण्याचा कोटा तुझा जिथे नसतो कसलाच तोटा
पंगतीत बसले की असतो तुझा सिंहाचा वाटा
मासे खायला खास गाठतो तू करद्याचा बीच
प्रमाण फिरण्याचे पाहून वाटे खराखुरा तू रीच, जय देव जय देव!

शेकड्याने गाणी पाठ तुझी रंगवी मेहफिल
लिरीकल डान्स तुझा करी सर्वा मश्गुल
टेबल वरचा रुबाब पाहून वाटे बसला ग्याम्बलर
विशेष म्हणजे तुज दुसरे नाही कसलेही व्यसन, जय देव जय देव!

सर्वगुणसंपन्न असा तू नावाचा हर्षद
माहिचा बाबा अन स्वातीचा कुमोद
मैत्रीच्या दुनियेचा राजा कायम सेवेस तत्पर
किती वर्णू तुझी देवा ही महिमा अपार, जय देव जय देव!!

जीने का रंगीन मौसम, ये खूबसुरत जमाना 
अपने यही चार पल हैं, आगे है क्या किसने जाना 
जीना जिसे आता है वो इन में ही मौज मना ले
कल की हमे फुरसत कहाँ, सोचे जो हम मतवाले!

जगावं_कसं याचं 
चालतं, बोलतं, खातंपीतं, नाचतं, गातं, हसतं, फिरतं, खेळतं असं जितजागतं उदाहरण पेश करणाऱ्या 
हजरजबाबी,हरहुन्नरी, विनोदी 
अशा बहुरंगी गुणांनी नटलेल्या 
दिलदार, हसतमुख, खुशमीजाज व्यक्तिमत्वाचे मालक श्री हर्षद माजगावकर यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा! 

With love and regards 

- D For Darshan

 

 

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...