क्रिगेट_टुगेदर
अलीकडच्या काही वर्षांत, मोस्टली दिपवाळीच्या पिरेड मध्ये,
मोबाईल्स अन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस नी आणलेल्या 'इझ ऑफ कम्युनिकेशन' मुळे शाळा, कॉलेजेस च्या आता स्वतःची मुलेमुली असलेल्या मुलामुलींची गेट टुगेदर्स वरचेवर होण्याचा ट्रेंड बघा चांगलाच प्रचलित झालाय!
बऱ्याच वर्षांनी एका बॅचचे वर्गमित्र, शक्य झाल्यास मैत्रिणी, यायोगे बऱ्याच वर्षानंतर एकत्र येतात,
स्वतःला इंट्रोड्यूस करतात,
शाळा कॉलेजेस च्या आठवणींमध्ये रमतात,
वेळेत एक्सप्रेस न झाल्यामुळे बहुतांशी करून एकतर्फी जगलेल्या प्रेमप्रकरणातुन मिळालेले धडे आबदारपणे कुरवाळले जातात,
न आलेल्यांचे आवर्जून पाणउतारे होतात,
लायक गुरुवर्यांचे स्मरण करत नाष्टा जेवणाचा आस्वाद घेतात, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी म्हणत वर्तमानातल्या त्या पुन्हा भेटण्याच्या आठवणी कॅमेऱ्यांमध्ये कैद करून पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याचे एकमेकांना आश्वासन देऊन भरलेल्या हृदयांनी परस्परांचा निरोप घेतात!
याच कन्सेप्ट च्या धर्तीवर,
दीपवाळीच्या आठवड्यात,
गावाच्या पारावर चारचौघांमध्ये जुन्या आठवणी चघळून नव्याने जगताना,
उजळून आलेल्या कल्पनेतून,
एका भन्नाट विषयात हात घातला गेला.
१९९५ ते २०१० पर्यंतच्या पंधरा वर्षांच्या कालखंडात तारळे गावातील
भाग फेमस नवलाईचा माळ असो किंवा नदीपलीकडचे वाळवंट असो,
थड्याच्या माळावरचे मैदान असो किंवा मार्केट यार्डाचे थ्री सिक्सटी डिग्री ग्राउंड असो,
पांढरवाडीचे रस्त्यालगतचे मैदान असो किंवा कोंजवड्याचे लांबलचक गोलाकार पठार असो,
आता दुर्दैवाने या ना त्या कारणाने खेळण्या लायक नसलेल्या अशा प्रत्येक ग्राउंड वरती त्या पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात क्रिकेटचा उत्मात घातलेल्या,
वेगवेगळ्या जनरेशन्स मध्ये तारळे जीमखाना, आदर्श, अचानक, हनुमान पेठ, नवयुग, मॉर्निंग अशा वेगवेगळ्या टायटल्स खाली येड्यागत क्रिकेट खेळलेल्या,
त्या काळी चित्याची चपळता असलेल्या अन आज बहुदा टुमटुमीत झालेल्या बैलांना एक दिवस एकत्र आणायचे अन दिवसभर फक्त क्रिकेट अन क्रिकेटच खेळायचे, त्या आज इतिहास झालेल्या आठवणींना वर्तमानात पुन्हा जगून भविष्यात ऐतिहासिक होईल असेल भन्नाट क्रिगेट टुगेदर करायचे!
कसं नुसत्या कल्पनेतूनच सिक्सर बसल्यासारखे वाटतेय का नाही??
महत्वाचे म्हणजे, ही नुसती बोलबच्चन टाइप कल्पनाच न राहता तिला लागलीच तडीस नेऊन आमलात आणण्याचा ध्यास घेऊन घाट रचला गेला आणि पहाता पहाता ठरवलेला दिवस दोन दिवसांवरही आला!
02 डिसेंबर,
वार रवीवार,
वेळ फ्रेश गारठ्याची चिल सकाळ,
स्थळ रिव्हर्स फॉल साठी प्रसिद्ध असलेला सडावाघापुरचा माळ!
याठिकाणी, यावेळी, गोळा होतील तीन-चार डझन खेळाडूज एकत्र वर असेल फक्त अन फक्त क्रिकेट या सांघिक खेळाचे एकमेव छत्र!!
सौजन्य : अखंड तारळ्यातील क्रिकेटसाठी यडे असलेले खुळे मंडळ
-D For Darshan