Close
In Travel

Lahoti Family Get-together

Great couple of days altogether of most awaited family get together!! cool

ओढ लावते अशी जीवाला गावाकडची माती साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती तारळेवारी, पुन्हा एकदा आली घडून वुइथ फॅमिली आलो विकेंड आम्ही जगून! परवाचा दिवस गुड फ्रायडेचा, मुहूर्त हनुमान जयंतीचा आणि या शुभदिनी योग आला सहकुटूंब, सहपरिवार आमच्या तारळे निवासस्थाना पासून काही मैल अंतरावरील डोंगरमाथ्यावर सहभोजनास जाण्याचा! निसर्गसमृद्धीच्या ईश्वरीय कृपादृष्टीने जात्याच श्रीमंत असलेल्या तारळे खोऱ्यात असं सहभोजन वगैरे करण्यास कैक पर्याय उपलब्ध नसतील तर नवल! त्यांपैकी आम्ही पर्याय निवडला तो नजीकच्या पाबळवाडीचा!

गेल्या काही वर्षांत, खासकरून आम्ही तारळ्यातून साताऱ्यात राहायला आल्यापासून असं सातारा पुण्यातून तीन चार गाड्यांचं तारळ्याला येणं आणि तिथून असं जवळपासच्या डोंगरावरील हवेशीर ठिकाणी जाऊन जागेवर जेवण बनवून सहभोजनाचा आस्वाद घेणं अन या काही तासांच्या पारिवारिक सहचाराने रिलेशनल बॉंडींग्ज थ्रू मिळणाऱ्या एनर्जीचा लॉंगटाईम वह्यालीडीटी चा रिचार्ज स्वतःला मारणं, हे तसं वरचेवर घडून यायचं. त्यामानाने कालच्या सहभोजनाचा असा हा योग बऱ्याच दिवसांनंतर आला! नेहमीप्रमाणे 'इंटर फॅमिली ग्यादरिंग, शेअरिंग, केअरिंग अँड लव्हींग इज ऑल टुगेदर अ स्ट्रॉगेस्ट बेस फॉर हॅपी लिव्हिन्ग' सारख्या नोन मेसेजची साऱ्यांची आठवण रिफ्रेश करून गेला!

आम्ही पाच भाऊ अलॉंग वुइथ आवर सौज, तीन मुली अलॉंग वुइथ देअर फॅमिलीज वगैरे मिळून आम्ही साधारण दोन एक डझन लोक यायोगे एकत्र आलो. नेहमीप्रमाणे अखंड किचनसंस्था दनानून सोडत राजेशशेठ नी जेवण बनविण्याची बहुतांशी जबाबदारी आपल्या खांद्यावर वाहिली. मग त्यामध्ये माचीस ची काडी, हिंगेच्या डबीपासून मठ्ठयात टाकायच्या बर्फापर्यंत लागणाऱ्या गोष्टी गोळा करण्यापासून अगदी सारंच आलं. आपलं जणू पेटंट असलेली राजेशभैय्याची चकचकीत लालभडक वांग्याची भाजी, मधे मधे हिरवट छटा दाखवणारं पिवळंधमक पिटलं, वांग्यांच्या मसाल्याचा मुलामा मारलेला बासुमती, हिरव्या मिरचीचा हिरवागार झटकेदार ठेचा, कांदा टोमॅटोची दहिमिश्रित कोशिंबीर, कुरुड्या-पापडाचं तळण, सर्वांच्या चवीप्रमाणे ऍडजस्टमेंट करत टेस्ट घेत घेतच संपलेला जयेशशेठ अन राजेशशेठ च्या कोरिओग्राफीवाला थंडगार मठ्ठा, शेवटी येऊ केलेलं चार दोन वांग्यांचं भरीत अन या साऱ्याच्या जोडीला बाहेरून हजेरी लावलेले गोड गुलाबजाम असा भरगच्च मेनू होता!

जेवण झाल्यानंतर भरलेली पोटे अन खाऊच्या पानांनी रंगवलेली तोंडे घेऊन थोडावेळ त्या आमवृक्षाखाली आलेल्या कैऱ्या मोजत वामकुक्षी घेतली. पुढे सरकत्या काळानुरूप, वाढती वये, वैयक्तिक कर्तृत्वाची जबाबदारी अन त्यायोगे तयार होणाऱ्या जनरेशन्सच्या लेयर्स मुळे परिवाराचे विभाजन अन विस्तार या अपेक्षित गोष्टी असतात. मग अशा झालेल्या विभाजनातून जेव्हा थाटात उभी ठाकलेली वृक्षे अन्न, वस्त्र, निवारा, गाड्याघोडी, मुलेबाळे अन एकंदरीतच सो कॉल्ड सेटलमेंट नंतर जेव्हा स्वतः सावली देऊ लागतात तेव्हा त्यांना पुन्हा त्या मूळ वटवृक्षाच्या मायेची ऊब, ती सावली नकळत हवीहवीशी वाटू लागते. जणू तीच मायेची सावली कायम असं सहकुटूंब, सहपरिवार वनभोजन करण्यासाठी बसलेल्या वृक्षाखाली जाणवते. जीवनप्रवासात जबाबदाऱ्यांचे ओझे वाहत शरीर अन मनाला आलेला क्षीण घालवते. तनामनामध्ये नवीन ऊर्जेचे प्रतिष्ठापन करून पुढील प्रवासासाठी तरोताज्या उत्साहाने सज्ज करते!

 

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...