Close

Ganesh Mahadik

आपले छायाचित्र पाहून माणूस जणू स्वतःच्याच प्रेमात पडावा, 

बायकोचे छायाचित्र पाहून नवऱ्याला आपल्या भार्येच्या सौंदर्याचा राहून राहून अभिमान वाटावा, 
नवऱ्याचे छायाचित्र पाहून बायकोला आपला मालक जगात भारी भासावा,
आपल्या दोघांचे वेडिंग, प्रिवेडींग, पोस्टवेडिंग शुट्स वगैरे पाहून हरएक कपलला आयुष्यभरासाठी लग्नगाठीत बांधणारा त्यांचा सुवर्णकाळ संतत स्मरण व्हावा,

अशा प्रत्येक नात्याला वेगळी ओळख देण्याची ताकद ठेऊन
कमालीच्या स्कीलफुल अन अद्ययावत टेक्नॉलॉजीज पद्धतींनी समृद्ध अशा गेल्या कैक वर्षांपासून आपल्या फोटोग्राफी सेवेने सातारकरांच्या सौंदर्यामध्ये भर घालून ती भर आयुष्यभरासाठी फोटोंच्या माध्यमातून त्यांच्यासाठी चिरंतर करणाऱ्या, 
हजारो तरुण-तरुणींच्या लग्न जमविण्याचे कारण, 
शेकडो बालगोपाळांची ज्यांनी कॅमेराकैद केली असेल चाईल्डहूडची आठवण, 
अशा खणआळीतील सुप्रसिद्ध महाडिक फोटो स्टुडिओज चे तहहयात मालक,

आपल्या भर तरुणाईत पहाटे चार वाजता जिम, दुपारी दोन वाजता नाष्टा, सायंकाळी सहा वाजता लंच वगैरे सारख्या कहर स्केड्युल साठी प्रचलीत असलेले अनंत इंग्लिश स्कुल मधून पास झालेले डीजीच्या वाणिज्य शाखेचे पदवीधर,

हल्ली भरगच्च दाढी मिशीत वावरणाऱ्या दंगा उसळून देणाऱ्या बुलंद आवाजाचे श्रीमंत व्यक्तिमत्व,

वन अँड ओन्ली श्री गणेश महाडीक यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!!

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...