Close
In Videos

Maharashtra Din Shubhechya

महाराष्ट्र_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा

वर्णू याची महिमा सांगूया कहाणी
वंदू या महाराष्ट्रा चला महाराष्ट्र दिनी! पीतो कृष्णा भीमा गोदाचे पाणी
बोले माय मराठीची हा वाणी
संतांची ही भूमी समृद्ध बहू रत्नांनी
वंदू या महाराष्ट्रा चला महाराष्ट्र दिनी!

पश्चिम याची धोई खारे अरबीचे पाणी
कडा ती रक्षीली सह्याद्रीच्या रांगांनी
शिवभूमी ही श्रीमंत गड गड किल्ल्यांनी
वंदू या महाराष्ट्रा चला महाराष्ट्र दिनी!

संगीत नृत्यप्रकार सुप्रसिद्ध ती लावणी
शेकरू या राष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी
ओळख पर्यटनाची पहा वेरूळच्या लेणी
वंदू या महाराष्ट्रा चला महाराष्ट्र दिनी!

मुघलांना हा नडला लढा प्रखर देऊनी
दिल्लीच्या तख्तावरही हा बसला मानानी
उचलला वाटा सिंहाचा स्वातंत्र्याच्या रणी
वंदू या महाराष्ट्रा चला महाराष्ट्र दिनी!

सर्वांगसुंदर मुंबई याची राजधानी
गाजवली हरक्षेत्रे इथल्या ताऱ्यांनी
नाव कोणाचे घ्यावे वाढविली शोभा साऱ्यांनी
वंदू या महाराष्ट्रा चला महाराष्ट्र दिनी!

वर्णू_याची महिमा सांगूया कहाणी
वंदू या महाराष्ट्रा चला महाराष्ट्र दिनी!

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...