Close

Ashutosh Javadekar

बीडीएस ची पदवी संपादन करून वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेले,

अद्ययावत सामग्री अन आल्हाददायक वातावरणात रुग्णसेवा पुरविणारे पुणे निवासी कुशल दंतचिकित्सक,

आपल्या इंग्रजी लिखाणाची व्याप्ती वाढावी म्हणून ऑलरेडी वैद्यकीय क्षेत्राचे डिग्री होल्डर असताना कला क्षेत्रातील इंग्रजी विषयात आपल्या तिशीमध्ये विद्यार्थी दशेत जाऊन युनिव्हर्सिटी टॉपर राहून एम ए केलेले डबल_पदवीधर,

पाश्च्यात्य संगीताची ओळख करून देणारे आणि त्याची हिंदुस्थानी संगीतप्रकारांशी अतिशय कल्पक तुलना करणारे लयपश्चिमा, तरुणाईच्या तरुण मनांना साद घालणारे मुळारंभ यांसारख्या नावाजलेल्या पुस्तकांचे निष्णात लेखक,

आजतागायत कैक सदर सादर केलेले अन आजरोजी लोकसत्ताच्या विशी, तिशी, चाळीशी या सदरातून रसिक वाचकांच्या भेटीस येऊन आपले या तिन्ही वयोगटात जगणारे मन उलगडणारे कमालीचे फ्लेक्झिबल_कॅरॅकटर_होल्डर,

पुन्हा एकदा वाहत गेलो पाण्यावरती सारख्या ओळींतून भावनांना शब्दबद्ध करणाऱ्या वीण सारखे गाणे विणलेले, तुज मज नाही भेद सारख्या अभंगाला आपल्या सुरेल आवाजात पेश केलेले संगीताचे गाढे अभ्यासक अन सुरेल गायक,

सतत या ना त्या स्टेजवरून या ना त्या विषयामध्ये हात घालत खासकरून तरुणाईला तर्कसंगत लॉजिकल विचारांचे दर्शन घडवित मार्गदर्शन करणारे मुरब्बी वक्ते,

कधी दक्षिणेतले मीनाक्षी मंदिर तर कधी उत्तरेतील राजस्थान अशी आपली लेखन दृष्टी घेऊन अविरत भ्रमंती करत राहणारे अन केलेल्या प्रवासाचे सचित्र वर्णन करून तो केलेला प्रवास चिरंजीव करून ठेवणारे पॅशनेट ट्रॅव्हलर,

आपल्या तल्लख बुद्धी अन फिट्ट शरीरयष्टीस धार लावण्यासाठी नियमितपणे जिमिंग, सायकलिंग वा तत्सम एक्झरसाईझ करणारे फिटनेस_फ्रिक,

अशा पद्धतीने एकाच आयुष्यात लेखक, कवी, सिंगर, वक्ता, डेंटिस्ट वगैरें सारख्या विविध व्यक्तीरेखा जगणारे आणि त्या जगत असलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला सुयोग्य न्याय देणारे, आत्ताच पर्यावरण खात्यामध्ये पुन्हा एकवार केंद्रीय मंत्री म्हणून नियुक्ती झालेले विद्यमान खासदार श्री प्रकाश जावडेकर यांचे सुपुत्र, गोऱ्यापान वर्णाच्या मिसरूड चेहऱ्यास साजेशी अशा आकर्षक शरीरयष्टीचे मालक, बौद्धिक, शारीरिक, आर्थिक, तात्विक, कौटुंबिक अशा सर्वानुमार्गे श्रीमंती लाभलेले अन एवढे असूनही आकाशाला स्पर्श करण्याचे स्वप्न साकार करताना आपले जमिनीवर असलेले पाय किंचितही हलू न देणारे ग्रेट ह्यूमन बियिंग डॉ_आशुतोष_जावडेकर सर यांना वाढदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!! 

With love & regards

- D For Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...