Close

Swapnil Khandelwal

काळ्याभोर दाढीतल्या सहा फुटी उंची देहयष्टीस खट्ट इन शर्ट केलेल्या कपड्यांनी सजवून

हातात ऍपलचा सेक्सी आयफोन घेऊन खण आळी चौकातील खंडेलवाल रिमोट शॉपी मध्ये ऐटदार रुबाबात बसलेले दिसणारे गोविंद नावानी ओळखले जाणारे स्वप्नील नावाचे सातारास्थित खंडेलवाल घराण्यास पडलेले दिव्यस्वप्न,

आपल्या डावखुऱ्या फलंदाजीने कधी कव्हर मधून कडक पंच मारून, कधी पायावर पडलेला चेंडू नजाकतीने फ्लिक करून, कधी एखाद्याला मुस्काडीत मारावी असा स्क्वेअर कट मारून तर कधी मिड ऑन च्या डोक्यावरून मारलेल्या उत्तुंग फटक्याने चेंडूला सीमारेषेबाहेर धाडून गोलंदाजांना घायाळ करणारे घमासान क्रिकेटचे उजव्या हाताने किफायतशीर गोलंदाजी करणारे मात्र झोपेच्या आवडेपोटी खेळायला यायला आळस करणारे पण कोणत्याही पार्टीला चुकूनही खाडा न करणारे खुंखार ब्याटिंग ऑलराऊंडर,

पुण्याच्या डी वाय पाटील कॉलेज मधून संगणक तंत्र क्षेत्राची पदवी संपादन केलेले कम्प्युटर गेमिंगचा प्रचंड नाद अन एक्सपर्टिज असलेले नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार सारख्या सर्व्हिसेस वर बेछूट प्रेम करणारे डीप वेब सारख्या भन्नाट छुप्या संकल्पनांचे छुपे अभ्यासक,

बरोबर अकरा साड़े अकराच्या दरम्यान बालाजीच्या कोपऱ्यात दिमाखात बसून एक प्लेट पुरीभाजी, एक प्लेट भजी अन एक सुका वडा असा डेली नाष्टा करणारे खाण्यापिण्याची हयगय नसलेले खवय्ये,

नायनटीजच्या गाण्यांवर भावनात्मक प्रेम करणारे वेस्टर्न संगीताचे दिवाने असलेले म्युझिकल फिल्मी कॅरॅकटर,

बायकोच्या धाकात असलेले पूत्ररत्नप्राप्तीने समृद्ध असे कुटूंबवत्सल गृहस्थ,

सातारा युवा माहेश्वरी शहर संघटनचा नियोजन मंत्री या पदाचा आपल्या मजबूत खांद्यांवर शिताफीने कार्यभार सांभाळणारे नारळाप्रमाणे वरून कडक भासणारे मात्र आतून कमालीचे निर्मळ असलेले असे हे राक्षस गणाचे हिरॉइक व्यक्तिमत्व, वन अँड ओन्ली, श्री_स्वप्नीलशेठ_खंडेलवाल उर्फ गोविंद यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!! 

With love & regards

- D For Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...