Close

Kishor Lahoti

मालक खण आळी कॉर्नर वरील नामांकित रंजना शोरूमचे,

पर्सन्यालिटी पाहताच ध्यानात यावे की आहेत हे मुरब्बी शेठजी व्यापार क्षेत्राचे!

शंकावर शंका, प्रश्नावर प्रश्न उपस्थित करून कोणत्याही क्षेत्राचे सखोल ज्ञानसंपादन करण्याचा जात्याच स्वभाव यांचा,
मिळालेल्या माहितीवरून तर्क लढवून त्या गोष्टींचा अभ्यास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो त्यांचा!

पदवीधरच डिजिच्या वाणिज्य शाखेचे त्यामुळे अर्थातच ज्ञानी आहेत व्यवहार शास्त्राचे,
न्यू चे माजी विद्यार्थी हे अगदी बरोब्बर गणित समजते यांना कुठे फायदा अन कुठे तोटा याचे!

राजेशाही व्यक्तीमत्व हे आपल्या निवांतपणासाठी आपल्या मित्रजनात प्रसिद्ध आहे,
स्वतःला कितीही उशीर झाला तरी आपण वेळेत असल्याचे दाखविण्याची यांची लाजवाब स्टाईल आहे!

आपल्या तरुणाईत जीमिंग वगैरे चा भारी नाद केलेले आता फक्त रुबाबात वेळ मिळेल तसे वाकिंग करतात,
खाण्याद्वारे पोटात ढकललेल्या कॅलरीज अन वाकिंग मधून वाया घालवलेल्या कॅलरीज याचा हिशोब घालताना दिसतात!

बाबा कदम, सुहास शिरवळकरांचे फ्यान असलेल्या किशोरशेठना वाचनाची जाम भारी आवड,
एकेकाळी पुस्तक हातात घेतल्यानंतर संपवूनच खाली ठेवणाऱ्या शेठना हल्ली नाईलाजाने मिळत नाही सवड!

कॅरम, बुद्धिबळ सारख्या बैठ्या खेळांचे शेठ आहेत स्किलफुल खेळाडू,
एकदा सुराला लागले की कॅरम वरच्या पिसा व्होलसेल मध्ये बिळात लागतात पडू!

तुम्हाला यांना पहायचे असल्यास न चुकता हे बालाजी कॉर्नर वर बरोब्बर पाच वाजता आपल्या मावळ्यांसोबत चहापान करताना भेटतील,
नुसते या ग्रुपमधले जहागीरदार कुठायत विचारा, इतरेजन आपसूक यांच्याकडे बोट दाखवतील!

असे हे चतुरस्र, चौकस बुद्धीच्या, दिलदार स्वभावाच्या, रुबाबदार व्यक्तिमत्वाचे बहारदार मालक, आमचे मित्रबंधू श्री किशोरशेठ लाहोटी यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!!!

With love & regards

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...