Close

Aniruddha Devi

आपल्या दिव्य कल्पनांचे तारे तोडून मनचक्षुनमध्ये भव्य मोहक डेकॉर डिझाइन्स उभ्या करून

आपले अभ्यासू टेक्निक आणि कामगारांना हाताळण्याचे शिस्तबद्ध कौशल्य यांची जोड देऊन त्या व्हर्च्युअल कल्पनांना फिजिकली जिवंत करणारे देवी घराण्याचे नव्या दमाचे, नव्या जमाण्याचे, कल्पक अन कलात्मक इंटेरियर डिझायनर,

संपूर्ण टीमच्या आधी कमीत कमी बावीस मिनिटे ग्राउंड वर हजर राहणारे घमासान क्रिकेटचे बॉल हाती दिला तर चार पावले रनप घेऊन खऊन खांदा मारून मारा करणारे अन बॅट हाती दिली तर भिंतीला लक्ष करून व्ही मध्ये तडाखे देणारे पांढऱ्या शुभ्र कपड्यात दाढीत वावरणारे सहा फुटी उंची अन रुंद खांड्याचे खमके ऑल राऊंडर,

याचवर्षी घमासान चे सदस्य बनलेले पण अतिशय अल्पावधीत कमालीची प्रगती करून ग्राउंड वरील विविध गोष्टींमध्ये स्वतः लक्ष घालून त्या मॅनेज करत कोच अन कॅप्टनच्या खांद्यावरचा भार कमालीचा हलका करणारे भावी कोच,

खेळ असो वा राजकारण, काम असो वा अर्थकारण, प्रत्येक गोष्टीचे अतिशय बारकाईने निरीक्षण करून, केलेल्या निरीक्षणाला आपल्या तार्किक बुद्धीची जोड देऊन, त्याविषयी आपले स्वतःचे असे ठाम मत बनवून, ते बनविलेले मत आत्मविश्वासाने अगदी स्पष्टपणे मांडण्याचे वाच्यकौशल्य असलेले वैचारिक व्यक्तिमत्व,

चहा मुव्हीज क्रिकेट सारख्या गोष्टी सोडल्या तर काडीचेही व्यसन नसलेले यारों के यार, मनाने फुल्ल दिलदार अँड लास्ट बट नॉट दि लिस्ट मोस्ट एलिजिबल बॅचलर असलेले आमचे खास मित्र श्री अनिरुद्ध देवी उर्फ ऍनी यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा! 

 

-  D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...