Close

Balu Pawar

काय विलक्षण योगायोग! आज राष्ट्रीय क्रीडादीन आणि बरोब्बर त्याच दिवशी आमच्या सातारा केमिस्ट असोसिएशन,

चाळीसगाव अन घमासान क्रिकेटचे कहर खेळाडू श्रीयुत बाळू पवारांचा वाढदिन! 

अखंड चाळीसगाव बामणोली अन इतरेतर परिसरात भल्याभल्या धुरंदर फलंदाजांची यांना गोलंदाजीस आलेले पाहूनच विट्टी गुल होते,

भल्याभल्या शातीर गोलंदाजांची बॉडी यांना हाती बॅट घेऊन फलंदाजीस उभे राहिलेले पाहूनच घाम सोडू लागते,

हे फिल्डिंग ला उभे असतील तिथून यांच्या पकडीच्या भीतीने बॉल स्वतःहूनच चार हात दूर राहतो,

देहबोलीतून एवढा शांत, सोज्ज्वळ दिसणारा माणूस मैदानावर एवढा स्फोटक, खुंखार अन आक्रमक कसा असू शकतो असा हमखास प्रश्न पाहणाऱ्यांना पडतो,

अशा चित्त्याच्या चपळाईचे धुरंदर अष्टपैलू क्रिकेटर बाळू पवार यांचा वाढदिन!

शिक्षणाने फार्मासिस्ट अन कोअर प्रोफेशनने सातारा शहरात औषधविक्रीच्या सेवेत कार्यरत असलेले मूळचे बामणोली गावचे रहिवासी,

बामणोली पर्यटन कार्यकारणीत सक्रिय असलेले, पर्यटकांना A1 दर्जाची व्हीआयपी सर्व्हिस देणारे, कास बामणोली तापोळा वासोटा खोऱ्यांची इत्तमंबूत माहिती राखणारे पर्यटन लाँजचे मालक,

शांत, सुस्वभावी, निगर्वी, निर्व्यसनी असे डाय हार्ड क्रिकेटपट्टू आर एक्स बाळू पवार यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा! 

With love & regards

-  D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...